
Nagpur Crime Video : नागपुरातील एका नराधमाकडून भररस्त्यात मुलींना पाहून अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणात बेलतरोडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. शांत कुमार या विकृत तरुणाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याच्याबाबत आणखी एक प्रकार समोर आला आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्यात शांत कुमार या विकृताविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा विकृत तरुण खापरी मेट्रो स्टेशन परिसरातही अश्लील कृत्य करीत असल्याचं समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपुरातील जेलरोडवर रात्रीच्या वेळी भर रस्त्यात मुलींना पाहून अश्लील कृत्य करणाऱ्या नराधमाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. त्याच्याविरोधात बेलतरोडी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खापरी मेट्रो स्टेशन परिसरातही तो अशाच प्रकारे अश्लील चाळे करत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेत गुन्हा दाखल केला. धक्कादायक बाब म्हणजे महिन्याभरापासून हा नराधम मुलींना त्रास देत होता. मात्र घाबरलेल्या मुली यासंबंधात तक्रार करण्यासाठी पुढे येण्यास तयार नव्हत्या.
नक्की वाचा - Beed Crime : बीडमधील पाचवा संतापजनक Video; आता तर क्रौर्याची हद्दच गाठली!
आरोपी हा नामांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करीत होता. शांत कुमार असं आरोपीचं नाव आहे. हा नराधम खापरी मेट्रो स्टेशन परिसरात अश्लिल कृत्य करीत होता. अखेर मुलींनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात शांत कुमार विरोधात तक्रार दाखल केली आहे. येथील सुरक्षा रक्षकानेही आरोपीबाबतची माहिती पोलिसांना दिली. तरुणींचं समुपदेशन केल्यानंतर त्या तक्रार दाखल करण्यासाठी तयार झाल्या.
शांत कुमार या नराधमाचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी एका तरुणीने सोशल मीडियावर टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि धंतोली पोलिसांनी आरोपीला अटक केली. सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात असून बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने तपासासाठी त्याला बेलतरोडी पोलीस ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world