प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी
Nagpur News : नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडिओचा वापर करीत नागपुरात एका तरुणीला ब्लॅकमेल करण्यात आलं. हे प्रकरण केवळ ब्लॅकमेलपर्यंत राहिलं नाही तर बळजबरीने लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय काळी जादू करीत महिलेला शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा पीडितेचा आरोप आहे. महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव मुस्ताक शेख असून त्याला अटक करण्यात आलं आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही घटना समोर आली आहे.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी अन् लग्न...
नोव्हेंबर २०२५ मध्ये पीडित तरुणी आणि मुस्ताकची ओळख झाली होती. मुस्ताकने पीडितेवर आपल्या आत्याच्या घरी नेऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेदरम्यान त्याचा मित्र राजा शेख आणि त्याच्या एका मित्राने या कृत्याचा व्हिडिओ चित्रित केला. आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुस्ताकशी लग्न करण्यास भाग पाडले.
या प्रकरणात पीडितीने तक्रार दिल्यावर पोलिसांनी छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी मुस्ताकला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world