जाहिरात

विमानांना स्फोटाने उडवण्याची धमकी देणारा गजाआड, 'तो' असं का करायचा?

स्फोटाने विमान उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव जगदीश उईके असे आहे. याने स्वत: नागपुरात येऊन पोलिसांसमोर आत्म समर्पण केले आहे.

विमानांना स्फोटाने उडवण्याची धमकी देणारा गजाआड, 'तो' असं का करायचा?
नागपूर:

संजय तिवारी 

विमानांना स्फोटाने उडवून देण्याची धमकी गेल्या काही दिवसापासून दिल्या जात होत्या. या धमक्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली होती. शिवाय विमान कंपन्याही हादरून गेल्या होत्या. अखेर या धमक्या देणाऱ्याला पोलिसांनी गडाआड केले आहे. हा धमकी देणारा मुळचा गोंदियाचा रहिवासी आहे. दरम्यान त्याची चौकशी केली असता, तो हे का करायचा याचं उत्तर ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

स्फोटाने विमान उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव जगदीश उईके असे आहे.  याने स्वत: नागपुरात येऊन पोलिसांसमोर आत्म समर्पण केले आहे. नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जगदीश हा गोंदिया येथील मूळ रहिवासी आहे. तो सध्या दिल्ली येथे रहात होता. त्यानेच कित्येक विमान कंपन्यांना धमकीचे ई मेल पाठवले होते. त्यामुळे विमानांची  उड्डाणं रद्द किंवा उशिरा करण्यात आली होती. त्याचा फटका विमान कंपन्यांना बसला होता. दिल्ली येथून विमान कंपन्यांना धमकीचे ई मेल पाठवणारा जगदीश उईके आतंकवादावरील एका पुस्तकाचा लेखक आहे. आतांकवाद - एक तुफानी राक्षस या नावाच्या पुस्तकाचा तो लेखक आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून आलेली रक्कम आतंकवाद विरोधी कार्यात खर्च करण्यात येईल असे पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मुद्रित केले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'ते काय औरंगजेब आहे का? स्वारी करायला निघाले' दानवे- सत्तार वाद पेटला

विमान कंपन्यांना मिळालेल्या धमक्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संपर्क केला होता. आपण स्वतः नागपूर येथे येऊन आत्मसमर्पण करणार असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र त्या नंतर एक दिवस उशिरा तो नागपूर पोलिसांसमोर हजर झाला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत धक्कादायक माहिती पोलिसांना त्याने सांगितली. मी पोलिसांना आणि व्यवस्थेला सतर्क करण्यासाठी हे करत होतो असे त्यांने चौकशी दरम्यान सांगितले. पोलिसांना सावध करण्यासाठी असं केल्याचेही त्याने सांगितले.

ट्रेंडिंग बातमी -  पवार कुटुंबात दुरावा वाढला? ऐन दिवाळीत बारामतीत काय झालं?

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील तो रहिवासी आहे. जगदीशला 2021 मध्ये याच कारणावरून अटक करण्यात आली होती. यावेळी नागपूर पोलिसांनी जगदीश याला संपर्क केला असता त्याने पोलिसांसमोर हजर होण्याचे आश्वासन दिले होते. तसा एकटा राहणारा 42 वर्षीय जगदीश उर्फ जग्गू मानसिक रुग्ण असल्याचे कळते. लहान पणी वडिलांचा मृत्यू झाल्यापासून तो असाच राहतो. काही दिवसांपूर्वी विमान कंपन्यांना त्याने नागपूर आणि दिल्ली येथून धमकीचे ई मेल पाठवले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.