जाहिरात

Nashik Crime : नायलॉन मांजाने कापला गळा, तब्बल 40 टाके पडले; नाशिकमध्ये दुचाकीस्वारासोबत भयंकर घडलं

नाशिकच्या वडाळा नाका परिसरात कामावरून घरी परतत असताना एका दुचाकीस्वार तरुणाचा नायलॉन मांजाने गळा कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nashik Crime : नायलॉन मांजाने कापला गळा, तब्बल 40 टाके पडले; नाशिकमध्ये दुचाकीस्वारासोबत भयंकर घडलं

नाशिकच्या वडाळा नाका परिसरात कामावरून घरी परतत असताना एका दुचाकीस्वार तरुणाचा नायलॉन मांजाने गळा कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मकरसंक्रात जवळ आली की पतंग उडवणाऱ्यांचं प्रमाण झपाट्याने वाढतं. मात्र हा नायलॉनचा मांजा जीवघेणा ठरू शकतो. यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहे. नाशिकमधील या घटनेतून तरुणाचा जीव जाऊ शकला असता.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तरुणाचा गळाच चिरला गेल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.  मुशरन मोहसीन सय्यद असं जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे. मुशरन सय्यद याचा गळा चिरला गेला असून तब्बल 40 टाके पडले असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मेनरोड येथील कापड दुकानात काम करून मुसरन हा सायंकाळी दुचाकीवरून वडाळा नाका परिसरात जात असताना त्याचा गळ्याला नायलॉन अडकला. या मांजामुळे त्याचा गळा कापला गेला. रक्तबंबाळ गंभीर जखमी मुसरन रस्त्यावर कोसळला.

CIDCO Lottery : सिडकोची 'परवडणारी' घरे सर्वसामान्यांना परवडेना! घरांच्या किमती पाहून ग्राहकांना फुटला घाम!

नक्की वाचा - CIDCO Lottery : सिडकोची 'परवडणारी' घरे सर्वसामान्यांना परवडेना! घरांच्या किमती पाहून ग्राहकांना फुटला घाम!

त्याच अवस्थेत नागरिकांनी त्याला जवळच्या खाजगी रुग्णाला दाखल केले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार करत गळ्याला 40 टाके घातल्याने त्याचा जीव वाचला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. पोलिसांकडून नायलॉन मांजा वापरणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असूनही शहरात सर्रासपणे महिलांना मांजर विक्री केला जात असल्याचे समोर येत आहे. तर या नायलॉन मांजावर लवकरात लवकर बंदी घालून नायलॉन मांजा हद्दपार करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com