जाहिरात

Nashik News : नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद? मल्टी नॅशनल IT कंपनीत महिलांसोबत भयंकर घडलं; काय आहे ते 9 गुन्हे?

लव्ह जिहाद पाठोपाठ हा नवा कॉर्पोरेट जिहादचा काही प्रकार आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता SIT ची देखील स्थापना करण्यात आली आहे. 

Nashik News : नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद? मल्टी नॅशनल IT कंपनीत  महिलांसोबत भयंकर घडलं; काय आहे ते 9 गुन्हे?
AI Image

Nashik News : नाशिकच्या एका अत्यंत नामांकित मल्टी नॅशनल आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण, छळ आणि धर्मांतरणचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले असून काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. मात्र या गुन्ह्यात जे काही आरोप करण्यात आले आहेत ते अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. लव्ह जिहाद पाठोपाठ हा नवा कॉर्पोरेट जिहादचा काही प्रकार आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता SIT ची देखील स्थापना करण्यात आली आहे. 

नाशिकच्या कंपनीतील ९ धक्कादायक गुन्हे..

लव्ह जिहादचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय तो नाशिकमधल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत. या कंपनीत जे सुरू होतं, त्यामुळे राज्यभरात कॉर्पोरेट जिहादची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई नाका परिसरात ही मल्टिनॅशनल कंपनी आहे. या कंपनीतल्या एचआर मॅनेजरकडून धर्मांतरासाठी जबरदस्तीसाठी केली जात होती. नमाज पठण करायला लावलं जायचं, मांसाहारी जेवण खायला लावायचं, हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह शब्दात बोललं जात होतं, मुलींना लज्जास्पद वागणूक दिली जायची, मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जायचा, यापैकी पीडित महिला 18 ते 26 वयोगटातल्या आहेत. 2022 पासून असे प्रकार कंपनीत सुरू होते. 

याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा 1, विनयभंगाचे 4, धार्मिक भावना दुखावत विनयभंगाचे 3 असे एकूण 8 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी एकूण 9 तक्रारदारांनी तक्रार केली आहे.  त्यापैकी ८ महिला तर एक पुरुष तक्रारदार आहे. आरोपीने बळजबरीनं धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. बळजबरी धर्मांतर केलेल्या संबंधित तरुणाचे संशयित आरोपीसोबतचे डोक्यावर गोल टोपी घातलेले फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हा प्रकार 25 मार्च 2026 ला उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुप्त तपास सुरू केला होता. 

नक्की वाचा - Ashok Kharat : अशोक खरातचं 46 वर्षांपूर्वीचं पहिलं मोठं कांड समोर; किशोरवयात 'कारनामा' करून झाला होता पसार 

नाशिकमधल्या या आयटी कंपनीत जे सहा गुन्हे दाखल झालेत, ते प्रचंड धक्कादायक आहेत. जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान दानिश शेख, तौसिफ अख्तार, निदा खाननं कर्मचारी महिलेच्या धार्मिक भावना दुखावल्या. तौसिफनं धमकावून शारीरिक संबंध ठेवले. इतरांनी ऑफिस लॉबीमध्ये विनयभंग केला. गुन्हा दोनमध्ये, मे २०२३ ते १९ मार्च २०२६ या काळात रझा मेमन, शाहरुख कुरेशीनं ऑफिसमध्ये विनयभंग केला. कंपनीच्या एचआर विभागाकडे याची तक्रार करण्यात आली. पण एचआर अधिकाऱ्यांनीही या दोघांच्या कृत्याला चिथावणी दिली. गुन्हा तीननुसार, शफी शेखनं ऑफिसच्या मीटिंगमध्ये एकटक पाहून तिच्या वैयक्तिक आयुष्यात संतती नसल्याबद्दल लज्जास्पद विधान केलं आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न केला

गुन्हा चारमध्ये म्हटलंय, मे ते डिसेंबर २०२५ मध्ये तौसिफने तरुणीच्या तिच्या खासगी आयुष्याबद्दल लज्जास्पद गोष्टी विचारल्या आणि इतर युवतींना धर्माबाबत बोलून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या.

गुन्हा पाच नुसार,  तौसिफ अख्तार, दानिश शेख आणि रझा मेमन यांनी तरुणाला त्याच्या धर्मातील देवाबद्दल अपशब्द बोलून विशिष्ट धर्माचे धार्मिक विधी करायला सांगितले. जबरदस्तीनं मांसाहार करायला लावला. त्याच्या धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केला आणि त्याच्या धर्मातल्या महिलांबाबत अश्लील शेरेबाजी केली. गुन्हा सहानुसार, आसिफ अन्सारी आणि शफी शेख या संशयितांनी युवतीचा विनयभंग केला. 

नाशिकमधल्या या आयटी कंपनीतल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात पीडित महिलांची संख्या मोठी असल्याचा संशय आहे. याप्रकरणी तक्रार करण्यासाठी 112 हा फोन नंबर जारी करण्यात आला आहे. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे. या प्रकरणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांची सुरक्षा आणि कामकाजाच्या वातावरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com