जाहिरात

Navi Mumbai : मतदानाआधीच झोप उडवणारा व्हिडीओ, नवी मुंबईच्या CBD बेलापूरमध्ये खळबळ,उमेदवारांची धाकधूक वाढली

नवी मुंबईतील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Navi Mumbai : मतदानाआधीच झोप उडवणारा व्हिडीओ, नवी मुंबईच्या CBD बेलापूरमध्ये खळबळ,उमेदवारांची धाकधूक वाढली
Navi Mumbai Shocking Video Viral
मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Crime News : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया उद्या 15 जानेवारीला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरु होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीही निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रशासन सज्ज झालं आहे. मतदानाच्या दिवशी शांतता आणि पारदर्शकता राखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात साडेतीन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बूथनिहाय पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अशातच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कोकण भवन सर्कल येथे वाहन तपासणीदरम्यान एका इनोव्हा कारमधून तब्बल 20 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या ठिकाणी प्रवास करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी

निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांसोबत समन्वय साधत नवी मुंबई पोलिसांनी दिघा ते बेलापूर,तसेच तुरभे,कळंबोली,पनवेल नवी मुंबईच्या सर्व प्रमुख एन्ट्री व एक्झिट पॉईंटवर नाकाबंदी केली आहे.या ठिकाणी प्रवास करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून,संपूर्ण कारवाई ऑन-कॅमेऱ्यावर व्हिडीओ रेकॉर्डिंगसह पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे.दरम्यान, सीबीडी बेलापूर परिसरात मोठी कारवाई समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कोंकण भवन सर्कल येथे वाहन तपासणीदरम्यान एका इनोव्हा कारमधून तब्बल २० लाख रुपये रोख जप्त केले. 

नवी मुंबई पोलिसांनी दिला इशारा 

याप्रकरणी नवी मुंबई सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याकडून कसून तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार,संबंधित वाहनामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह,प्रचार साहित्य किंवा थेट राजकारणाशी संबंधित पुरावा आढळून आलेला नाही.त्यामुळे हे 20 लाख रुपये कुठून आणण्यात आले?कशासाठी वाहतूक केली जात होती? याचाही तपास पोलीस करत आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीनं पोलिसांना कळवावे,असे आवाहन करण्यात आले आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com