जाहिरात

पती- पत्नीने लेकीसह आयुष्य संपवलं; कारण ऐकून सगळेच सुन्न

आई वडील अन् मुलीने ट्रेनखाली एकत्रितपणे आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना परभणी जिल्ह्याच्या धारखेड परिसरात घडली होती. याप्रकरणात आता मोठा खुलासा झाला असून एकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

पती- पत्नीने लेकीसह आयुष्य संपवलं; कारण ऐकून सगळेच सुन्न

दिवाकर माने, परभणी: आई वडील अन् मुलीने ट्रेनखाली एकत्रितपणे आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना परभणी जिल्ह्याच्या धारखेड परिसरात घडली होती. शिक्षक कुटुंबाने एकत्रितपणे इतक्या टोकाचा निर्णय का घेतला असावा? असा सवाल उपस्थित होत होता. याप्रकरणी आता सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली असून मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी मिळाल्याने या कुटुंबाने आयुष्य संपवल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवार (ता. 28 नोव्हेंबर) रोजी परभणीच्या धारखेड परिसरातील रेल्वे लाईनवर एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. परभणी शहरातील ममता विद्यालयातील माध्यमिक विभागात कार्यरत आसलेले मसनाजी सुभाषराव तुडमे त्यांच्या पत्नी रंजना तुडमे (वय 40) आणि त्यांची 21 वर्षांची मुलगी अशी आत्महत्या केलेल्यांची नावे होती. या तिहेरी आत्महत्येमागचे कारण शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. याप्रकरणात आता मोठा खुलासा झाला असून एकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

नक्की वाचा: राजकारणात वारं फिरलं; हर्षवर्धन पाटलांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट?

या घटनेतील मुलीचे आक्षेपार्ह  फोटो व्हायरल करत कुटुंबीयांना त्रास दिल्यामुळे हा प्रकार झाल्याचा खुलासा समोर आला आहे. शुभम राऊत नावाच्या यांनी तरुणाने मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, सोबतच आणखी फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची धमकी दिली होती. त्यातूनच हा प्रकार झाला असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी शिवम राऊत या युवकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भितीने या संपूर्ण कुटुंबाने आयुष्य संपवले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून याप्रकरणी कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाची बातमी: 9 निवडणुका, 6 चिन्हे अन् 7 व्यांदा विधानसभेत; 'या' आमदाराने केला अनोखा राजकीय विक्रम

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com