पिंपरी चिंचडवमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. त्यात 3 कामगारांना आपला जीव गमवाला लागला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी सद्गुरू नगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. ज्या पाण्याच्या टाकीखाली हे तीन कामगार चिरडले गेले ती नुकतीच बांधली गेली होती. त्याचे बांधकाम कच्चे असल्यामुळे ती कोसळली. या भागात कामगारांची वस्ती आहे.तिथेच हे मृत झालेले कामगार राहात होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भोसरी सद्गुरू नगर परिसरात एक लेबर कॅम्प आहे. तिथे पाण्याची मोठी टाकी उभारण्यात आला आहे. ज्या लेबर कॅम्प परिसरात ही घटना घडलीय त्या ठिकाणी 1 हजारहून अधिक कामगार वास्तव्यास आहेत. जिथे उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकी खाली हे कामगार काम करत होते. त्या टाकीचे काम हे पूर्ण होऊन काही दिवस देखील झाले नव्हते. बांधकाम कच्चे असल्यामुळे ही टाकी कोसळली असा अंदाज आहे.
ट्रेंडिंग बातमी - चला उमेदवारी अर्ज भरायला! 'हे' दिग्गज भरणार आज उमेदवारी अर्ज
ज्या वेळी ही टाकी कोसळली त्यावेळी त्या खाली कामगार हे काम करत होते. दरम्यान ही जागा रेड झोनमध्ये येत असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि पिंपरी चिंचवड पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. जर कोणी यामध्ये दोषी आढळल्यास त्यावरती कारवाई केली जाईल असं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world