शरद सातपुते, प्रतिनिधी
Sanjay Bhokare News Today : दैनिक जनप्रवासचे मालक व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक संजय भोकरे यांच्या हत्येच्या तयारीत असलेल्या तिघांना सांगलीमध्ये शस्त्रांसह अटक करण्यात आली आहे.दोन देशी बनावटीच्या पिस्तूलसह चाकूचे शस्त्र पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. भोकरे यांच्या सांगलीतील पाटणे प्लॉट काळी वाट रस्त्यावर हत्येच्या तयारीत असलेल्या तिन्ही आरोपींना बंदुकीसह अटक करण्यात आली. यावेळी एक आरोपी फरार झाला.जमीन विक्री व्यवहारातून भोकरे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता,असं आरोपींनी पोलिसांना सांगितलं.
याप्रकरणी गणेश चंद्रकांत लोखंडे (32) संग्राम संभाजी फडतरे (27) दोघेही राहणार हरिपूर रोड सांगली विराज प्रकाश बुटाले (41) राहणार आंबेडकर रोड सांगली,अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर आरोपी सचिन आवळे हा फरार आहे.दैनिक जनप्रवास चे मालक आणि संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे सर्वेसर्वा संजय भोकरे यांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला.
नक्की वाचा >> Missing Link News : मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचा श्वास मोकळा, 'या' घाटाचा प्रवास टाळता येणार
त्या जमिनीसाठी मोठी प्लॅन केला आणि..
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फरार सचिन आवळे व त्याचा सहभागिदार यांच्या नावे भोकरे इंजिनिअरिंग कॉलेजजवळ असलेली जमीन ही संजय भोकरे यांच्या कब्जात असल्याची माहिती आरोपी बुटाले यांनी दिली. ती जमीन सोडवून घेण्यासाठी संजय भोकरे यांची हत्या केल्यानंतर सहजासहजी ती जमीन ताब्यात घेता येईल.
तर जमीन ताब्यात घेतल्यावर जमीन विक्रीच्या व्यवहारातून मोबादला देतो,असे सचिन आवळे याने पोलिसांना सांगितले. यासाठी गणेश लोखंडे व संग्राम फडतरे याला देशी बनावटीचे पिस्तुल खरेदी करण्यासाठी पैसे दिले असल्याचे सांगितले.फेब्रुवारी 2026 ला सोनभद्र उत्तरप्रदेश येथून 2 पिस्तुल व 8 जिवंत काडतुसे खरेदी केल्याचे सांगितले.
नक्की वाचा >> Ahilyangar News: आजीसोबत निघालेला ओमकार गायकवाड घरी परतलाच नाही..भयंकर घटनेमुळं अहिल्यानगर हळहळलं
गणेश लोखंडेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे
त्यानुसार संजय भोकरे हे त्यांच्या वर्तमान पत्राच्या कार्यालयात केव्हा केव्हा येतात,याची माहिती माहिती काढून त्यांच्यावर हल्ला करून ठार मारण्याचा कट रचला होता,अशीही माहिती समोर आलीय.यासाठी आरोपींनी चारचाकी गाडी खरेदी केली. ओळख पटू नये यासाठी बनावट नंबर प्लेटही बसविण्यात आली होती यातील गणेश लोखंडेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांच्या सतर्कतेने खूप मोठा अनर्थ टळला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world