आपण रेल्वेत विना तिकीट प्रवास करण्याबाबत ऐकलं किंवा पाहिलं असेल. अनेक जण अशा पद्धतीने प्रवास करतात. काही जण तर अगदी रेल्वेच्या शौचालयातही लपून प्रवास करतात. पण या पेक्षा जर कोणी वेगळा मार्ग अवलंबत असेल तर. हो तसं घडलं आहे. एका तरुणानं रेल्वेच्या बोगी ऐवजी रेल्वेच्या खाली चाकाजवळ असलेल्या ट्रॉलीमधून प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याने तब्बल 250 किलोमिटर प्रवास अशा स्थितत केला. ही घटना पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रेल्वेमध्ये सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना केल्या जातात. असं असलं तरी काही लोक अजूनही आपला जीव धोक्यात घालून प्रवास करताना आढळून येतात. आपल्या जिवाचं काही बरं वाईट होईल याचा विचार ते करत नाहीत. अशीच एक घटना जबलपूरमध्ये समोर आली आहे. एका तरुणाने ट्रेनखाली असलेल्या ट्रॉलीमध्ये लपून जवळपास 250 किलोमीटरचा प्रवास केला आहे. जबलपूर येथे ज्यावेळी रेल्वे आली. त्यावेळी तिथे काही कर्मचारी रेल्वेची तपासणी करत होते. त्यावेळी त्यांनी या तरुणासा तिथे पाहीले. त्यांना त्याला त्या आवस्थेत प्रवास करताना पाहून धक्का बसला. त्यानंतर त्याला बाहेर काढून आरपीएफच्या हवाली करण्यात आले.
ट्रेंडिंग बातमी - Viral video: हॉर्न वाजवण्यावरून महानाट्य, रागाच्याभरात गाडीच्या टपावर चढला अन्...
पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. ट्रेनच्या एसी-4 डब्याखाली हा तरुण ट्रॉलीमध्ये लपला होता. या रेल्वेमध्ये त्याने इटारसी ते जबलपूर असा प्रवास केला. ज्यावेळी ही ट्रेन जबलपूर स्टेशनवर पोहोचली त्यावेळी त्याची तपासणी केली जात होती. त्याच वेळी त्यांची नजर ट्रॉलीमध्ये लपलेल्या या तरुणावर पडली. या अवस्थेतच त्यांने जवळपास 250 किमीचा प्रवास केला होता. त्याला तिथून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली. त्याची चौकशीही केली.
ट्रेंडिंग बातमी - BJP Annamalai: पाठीवर चाबकाचे फटके मारत घेतली मोठी शपथ, राजकारणातली नवी स्टाईल
ज्यावेळी त्याची चौकशी करण्यात आली त्यावेळी त्याने धक्कादायक खुलासा केला. आपल्याला रेल्वेने प्रवास करायचा होता. पण तिकीटासाठी पैसे नव्हते. त्यामुळे आपण रेल्वे खाली असलेल्या ट्रॉलीतून प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितलं. पण या तरुणाची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचा संशय पोलिसांना आला. त्याला जे प्रश्न विचारले जात होते त्याची उत्तरं तो अगदी वेगवेगळ्या पद्धतीने तो देत होता. मात्र त्याच्या या अजब प्रवासामुळे सर्वच जण आवाक झाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world