जाहिरात

Ratnagiri News: अध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुलात अल्पवयीन मुलीचे शोषण, जास्त मुलींचे शोषण झाल्याची भिती

या प्रकणी आरोपी कोकरे आणि कदम यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Ratnagiri News: अध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुलात अल्पवयीन मुलीचे शोषण, जास्त मुलींचे शोषण झाल्याची भिती
रत्नागिरी:

राकेश गुडेकर 

खेड तालुक्यातील लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल” येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पीडित अल्पवयीन तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात संशयित भगवान कोकरे महाराज आणि त्याचा सहकारी प्रितेश प्रभाकर कदम यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शिवाय हा प्रकार एका आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुलात झाल्यानं उलट सुलट चर्चाही सुरू झाली आहे.   

या प्रकरणी खेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी मागील काही काळापासून गुरुकुलात आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती. यावेळी गुरुकुलातील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे महाराज याने अनेकदा तिच्याशी अश्लील वर्तन केले. तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. असं या अल्पवयीन तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर पीडीतेने गुरुकुलातीलच एका सदस्याला ही घटना सांगितली होती. त्याने याबाबत कुठे काही बोलू नकोस. महाराजांची सामाजिक व राजकीय ओळख असून तिला गप्प राहण्यास सांगीतलं. शिवाय तिला धमकावण्यात ही आले असा आरोप ही पीडित तरूणीने केला आहे.  

नक्की वाचा - Nashik News: आधी टक्कल केलं मग धिंड काढली! भाईगिरीवर रॅप साँग बनवणाऱ्यांना अद्दल घडवली

याबाबत जर कोणाला काही सांगितले तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल असेही तिला सांगितल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. पीडितेच्या बाबतीत वारंवार अशा प्रकारच्या  घटना घडू लागल्या. एकदा नाही तर अनेक वेळा तिचा विनयभंग करण्यात आला. अखेर हा सर्व प्रकार तिच्या कुटुंबातील सदस्यांना समजला. कुटुंबीयांनीनंतर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या संदर्भात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरुन पोलीसांनी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक सणस आणि पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान फक्त आपल्या सोबत नाही तर गुरूकुलात राहणाऱ्या अन्य मुलींसोबतही अशा घटना घडल्याचं पीडित तरूणीने सांगितले आहे.  

नक्की वाचा - Kalyan News: बस, बायको अन् दिड लाखाचा मोबाईल! अर्धा तास बसला रोखलं, ट्राफीक जॅम केलं, प्रकार काय?

या प्रकणी आरोपी कोकरे आणि कदम यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धार्मिक संस्थांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने समाजात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपींची गंभीर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर भास्कर जाधव यांनी आणखी गंभीर आरोप केला आहे. हे प्रकरण एकाच मुलीबरोबर नाही तर अनेक मुलीबरोबर झालं असल्याचा संशय भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. या महाराजाच्या मठात जे जे नेते आले होते, त्या सर्वांना आस्मान दाखवणार असल्याचा इशारा आमदार भास्कर जाधव यांनी दिला आहे. या प्रकरणातील आरोपी कोकरे हा भाजपचा पदाधिकारी असल्याचं ही जाधव यांनी सांगितलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com