
मोसिन शेख, प्रतिनिधी
Santosh Deshmukh murder case : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खटला न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने आपण निर्दोष असल्याचं सांगत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. लवकरच या प्रकरणात सुनावणी होणार आहे. दरम्यान संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्यांना लवकरात लवकर कडक शिक्षा द्यावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. दरम्यान या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीडच्या जिल्हा न्यायालयात परीक्षण अहवाल सादर करण्यात आला असून यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाच्या पुराव्याचा समावेश आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करताना चार हत्यारांचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. देशमुखांच्या शरीरावर 150 व्रण आणि 56 जखमा आढळून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहेत.
नक्की वाचा - Santosh Deshmukh Case : "माझी निर्दोष मुक्तता करा, वाल्मिक कराडची मागणी"; आज कोर्टात काय घडलं?
देशमुख यांना रॉडसारख्या शस्त्राने अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या पाठीसह छाती, हात, पाय आणि चेहऱ्यावर देखील वार करण्यात आले होते. या मारहाणीत देशमुखांच्या फुप्फुसाला इजा झालेली होती. या अहवालात नमूद केल्यानुसार, देशमुख यांना प्रचंड मारहाण झाल्याने ते शॉकमध्ये गेले होते. हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंज्युरीज (Hemorrhage and Shock Due to Multiple Injuries) असा शवविच्छेदन अहवालाच्या अंतिम निष्कर्षात उल्लेख करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world