जाहिरात

Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामीने दिली मामाच्या हत्येची सुपारी, पुणे प्रकरणात मोठा ट्विस्ट 

क्राईम ब्रँचकडून चौकशी अंती आमदाराच्या मामीला अटक करण्यात आली आहे.

Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामीने दिली मामाच्या हत्येची सुपारी, पुणे प्रकरणात मोठा ट्विस्ट 
पुणे:

पुणे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं 9 डिसेंबर रोजी अपहरण झालं होतं. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती. एका 29 वर्षीय तरुणाला सतिश वाघ यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे. क्राईम ब्रँचकडून चौकशी अंती आमदाराची मामी मोहिनी वाघ हिला अटक करण्यात आली आहे. 

विवाहबाह्य संबंधातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मोहिनी वाघ यांनी एका व्यक्तीला सुपारी देऊन सतीश वाघ यांच्या हत्या करवून आणण्याची माहिती समोर आली आहे. 

Kota News : आजारी पत्नीची सेवा करण्यासाठी नोकरी सोडली, फेअरवेल पार्टीत पत्नीचा मृत्यू

नक्की वाचा - Kota News : आजारी पत्नीची सेवा करण्यासाठी नोकरी सोडली, फेअरवेल पार्टीत पत्नीचा मृत्यू

कशी झाली होती हत्या?
आमदार योगेश टिळेकरांचे अपहरण झालेले मामा सतीश वाघ यांचा मृतदेह यवत गावच्या हद्दीत सापडला होता. आमदार टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचे शेवाळ वाडीतून अपहरण करण्यात आल्याची माहिती होती. ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास सतीश वाघ सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर थांबले होते. तेव्हा एक चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केलं होतं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आरोपींचा शोध सुरूच होता. त्या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com