
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आता समोर आले आहेत. हे फोटो ज्या वेळी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पाहिले त्यावेळी ते ढसाढसा रडू लागले. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. ही सर्व दृष्य पाहून, ज्यावेळी ही बातमी प्रसारीत होत होती, त्याच वेळी अँकरींग करत असलेल्या कविता राणे यांना ही अश्रू अनावर झाले. किती क्रुर पणे हत्या केली जावू शकते याचा अंदाज या फोटोवरून येतो. आपल्या कुटुंबातील व्यक्ती बरोबर असं काही झालं असतं तर काय झालं असतं हा विचार करूनच अंगावर काटा येतो. तिच स्थिती ही बातमी प्रसारीत होत असताना दिसून आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुणाच्याही नशिबी हे मरण येवू नये असं हे मरण होत होतं. असं कविता राणे, त्यावेळी सांगत होत्या. तर आपण हे फोटो पाहून हादरून गेलो आहोत असं धनंजय देशमुख यांनी सांगितले. मी माझ्या भावावर खूप प्रेम करायचो. मी पहिला फोटो पाहीला आणि माझे डोळे बंद केलं असं त्यांनी सांगितलं. इतका क्रुरपणा करून ही काही लोक याचे समर्थंन करत आहेत. हे हारामखोर आहेत. चुकीला चुकही ते बोलायला तयाप नाहीत. त्यांनी खूप वाईट पद्धतीने भावाला मारलं. मी हे पाहीलं तर संपून जाईन. अशा भावना देशमुख यांनी हे फोटो पाहील्यानंतर एनडीटीव्ही मराठी बरोबर व्यक्त केल्या.
संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याचे वर्णन आतापर्यंत सांगितले जात होते. ते वर्णन ऐकून मन सुन्न होत होतं. अंगावर काटा येत होता. पण त्यांच्या हत्येच्या वेळचे फोटो आता समोर आले आहेत. ते फोटो पाहील्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्या शिवाय राहात नाहीत. सीआयडीने जे चार्जशिट दाखल केले आहे, त्यात या फोटोंचा समावेश करण्यात आला आहे. ज्या वेळी हत्या करण्यात येत होती त्यावेळी व्हिडीओ काढले गेले. ते व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागले. त्यातूनच स्क्रीनशॉर्ट घेवून हे फोटो काढण्यात आले. त्याचा समावेश आरोपपत्रात करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग बातमी - MLA Salary: आमदारांना दर महिन्याला किती पगार मिळतो? आकडा ऐकाल तर म्हणाल...
हे फोटो पाहीले तर मन विचलित करू शकतात असे आहेत. किती क्रुरपणे हत्या केली गेली असेल याचा अंदाज हे फोटो पाहील्यानंतर येते. कुणा दांडक्याने मारत आहे. कोणी मानेवर पाय ठेवला आहे. कुणी तोंडामध्ये लघुशंका करत आहे. कोणी व्हिडोओ काढताना हसत आहे. त्यात संतोष देशमुख यांचा पुर्ण चेहरा सुजलेला दिसत आहे. ते जमिनीवर गतप्राण होवून पडले आहेत. त्या अवस्थेतही त्यांना मारलं जात आहे. अशा पद्धतीचे हे फोटो आता समोर आले आहेत.
या हत्येच्या कटामध्ये आरोपी क्रमांक एक वाल्मीक कराड, आरोपी दोन विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, आठव्या क्रमाकांवर फरार कृष्णा आंधळेचा समावेश करण्यात आला आहे. नववा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याचे नाव वगळण्यात आले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्धचे सबळ पुरावे सापडल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. आता या हत्येचे फोटो समोर आले आहे. ते पाहिल्यावर अंगावर काटा आल्या शिवाय राहात नाहीत. गंभीर बाब म्हणजे हत्या करताना आरोपी हसत होते. त्याचेही फोटो पोलीसांच्या हाती लागले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world