जाहिरात

शाहरूख खानला धमकी देणारा अटकेत, फोन चोरून भलत्यानेच धमकी दिल्याचा फैजानचा दावा

वांद्रे पोलीस ठाण्यात फोन करून अज्ञात व्यक्तीने शाहरूख खानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.

शाहरूख खानला धमकी देणारा अटकेत, फोन चोरून भलत्यानेच धमकी दिल्याचा फैजानचा दावा
मुंबई:

बॉलीवूड अभिनेता, किंग खान अर्थात शाहरूख खान याला धमकी देण्यात आली. अभिनेता सलमान खान याच्यापाठोपाठ शाहरूखलाही जीवे ठार मारण्याच्या धमक्या यायला लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर या अभिनेत्यांना मिळणाऱ्या धमक्यांचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे.  वांद्रे पोलीस ठाण्यात फोन करून अज्ञात व्यक्तीने शाहरूख खानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. तपासादम्यान पोलिसांना कळाले की हा फोन रायपूरहून आला आहे. अधिक तपास केला असता पोलिसांना कळाले की ज्या फोनवरून धमकी देण्यात आली तो मोबाईल नंबर फैजान नावाच्या व्यक्तीचा आहे. 

नक्की वाचा : 'येक नंबर' ब्लॉकबस्टर सिनेमाचा 'या' दिवशी वर्ल्ड प्रीमिअर

एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना फैजानने म्हटले की त्याचा फोन 2 नोव्हेंबरला चोरीला गेला होता. याच फैजानने दावा केला आहे की त्याने शाहरूख खान याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, आणि यात तक्रारीमुळे त्याच्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. 

नक्की वाचा : 38 वर्षांच्या अभिनेत्रीनं 49 वर्षांच्या 'बाबा' शी केलं दुसरं लग्न, Photo Viral

फैजान याने दावा केला आहे की, त्याने शाहरूख खान याच्याविरोधात समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. फैजान याने एका व्हिडीओची लिंक शेअर करत शाहरूख खानवर आरोप केले होते. फैजानने म्हटले होते की, अंजाम नावाच्या चित्रपटात शाहरूख खानच्या तोंडी एक संवाद आहे ज्यात तो हरीणाची शिकार करून त्याचे मांस शिजवायला त्याच्या कामगारांना सांगतो. अशी दृश्ये समाजात तेढ निर्माण करणारी ठरू शकतात असे फैजानचे म्हणणे होते. शाहरूख खानचे दहशतवादी विचारांच्या लोकांशीही संबंध असल्याचा आरोप फैजानने केला होता. 

नक्की वाचा : कृति सेनॉन 9 वर्षे लहान तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये? इतके कोटी रुपये आहे त्याची संपत्ती

सलमान खान याला लॉरेन्स बिष्णोई टोळीतर्फे धमक्या दिल्या जात आहे. काळवीटाच्या शिकारीप्रकरणानंतर बिष्णोई टोळी सलमान खानविरोधात गेली असून यानंतर सलमान खानला धमक्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. बिष्णोई टोळीच्या गुंडांनी सलमान खान याच्या इमारतीबाहेर गोळीबार केला होता. सलमान खान याचा मित्र असलेले बाबा सिद्धीकी यांच्या हत्येमागेही बिष्णोई टोळीच असल्याचे दिसून आले आहे.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com