
एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यानंतर या तरुणीला मध्य प्रदेशातून हिंगोलीला बोलावण्यात आलं. ती आल्यानंतर आधी अल्पवयीन मुलाने या अल्पवयीन मुलीबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले. मग या अल्पवयीन मुलाच्या बापाची नजरही या तरुणीवर पडली. जर तुला माझ्या मुलाशी लग्न करायचं असेल तर तुला माझ्या सोबतही शरीर संबंध ठेवावे लागतील. त्यानंतर त्या बापानंही या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केले. मात्र हा त्रास सहस्य झाल्यानंतर या तरुणीने पोलिसांची मदत मागितली. त्यानंतरच या तरुणीची बाप-लेकाच्या तावडीतून सुटका झाली. ही घटना हिंगोलीत घडली.
पीडित तरुणी ही मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये राहाते. ती Weplay app हे अॅप वापरत होती. याच app वरून तिची ओळख हिंगोलीतल्या तरुणासोबत झाली. तो ही अल्पवयीन होता. तरुणीही अवघ्या 15 वर्षांची आहे. या मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवलं. शिवाय हिंगोलीला येण्यासही सांगितलं. तिने या तरुणावर विश्वास ठेवला. मग ती थेट मध्य प्रदेशातून हिंगोलीत दाखल झाली. पुढे काय होणार आहे याची पुसटती कल्पनाही त्या तरुणीला नव्हती.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
ती हिंगोलीत आल्यानंतर त्या अल्पवयीन तरुणाने त्या तरुणी सोबत शरिर संबंध प्रस्थापित केले. त्याच वेळी त्याच्या बापाची वाईट नजरही त्यामुलीवर पडली. त्याने तुला जर माझ्या मुलासोबत लग्न करायचे असेल तर माझ्या सोबत ही शरीर संबंध ठेवावे लागतील असं सांगितलं. त्यानंतर त्यानेही त्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केला. झालेल्या घटनेनं तरुणी हादरून गेली होती. तिने आपल्याला घरी जावू द्या अशी विनंती केली. पण तिला त्या दोघांनी सोडले नाही.
शेवटी तरुणीने हिंमत करून पोलीस हेल्पलाईनला फोन केला. त्यावर तिने पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. शिवाय त्या मुलीची सुटकाही केली. मुलीच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय त्या आरोपीना अटक ही करण्यात आली आहे. सध्या ही मुलगी हिंगोलीत आहेत. पुढील कारवाई करून तिला तिच्या घरी मध्य प्रदेशला पाठवण्यात येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world