जाहिरात

Palghar News : शिक्षकांकडून वक्तशीरपणाचे धडे, वर्गात दहशत; घाबरलेल्या विद्यार्थ्यांचा स्वत:च्याच जीवाशी खेळ

शाळेत पोहोचायला उशीर झाला म्हणून एका १३ वर्षाच्या मुलीला १०० उठाबशा काढायची शिक्षा देण्यात आली होती. यामध्ये मुलीची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना पालघरमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Palghar News : शिक्षकांकडून वक्तशीरपणाचे धडे, वर्गात दहशत; घाबरलेल्या विद्यार्थ्यांचा स्वत:च्याच जीवाशी खेळ

Palghar News : शाळेत पोहोचायला उशीर झाला म्हणून एका १३ वर्षाच्या मुलीला १०० उठाबशा काढायची शिक्षा देण्यात आली होती. यामध्ये मुलीची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना पालघरमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना जव्हार तालुक्यातील जांभूळमाया येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जांभूळमाया येथील शिक्षक लोकनाथ जाधव यांनी काही विद्यार्थ्यांना पाच किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावर पाणी भरायला पाठवलं होतं. मात्र झरा लांब असल्याने विद्यार्थ्यांना पाणी आणण्यास उशीर झाला. पोहोचायला उशीर झाला म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. यामुळे भीतीने उरलेले विद्यार्थी जंगलात लपून बसले. 

Latur News : 'काळी आई'साठी राबताना जीवाभावाच्या मित्रांचा मृत्यू, कारण समोर येताच राज्यभरातील शेतकरी हादरले

नक्की वाचा - Latur News : 'काळी आई'साठी राबताना जीवाभावाच्या मित्रांचा मृत्यू, कारण समोर येताच राज्यभरातील शेतकरी हादरले

ही बाब समोर येताच गावकऱ्यांनी संताप व्यक्त केली. ढाढरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष मोरे यांनी शिक्षक लोकनाथ जाधव यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com