जाहिरात

Shirdi News : दुहेरी हत्येने शिर्डी हादरली; भररस्त्यात दोघांची हत्या, VIDEO आला समोर

Shirdi Crime News : सोमवारी पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका तासांच्या अंतराने तीन ठिकाणी हे हल्ले करण्यात आले आहेत.

Shirdi News : दुहेरी हत्येने शिर्डी हादरली; भररस्त्यात दोघांची हत्या, VIDEO आला समोर

सुनील दवांगे, शिर्डी

श्रद्धा, सबुरीचा गुरुमंत्र देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत लोकांचा संयम तुटत चालला आहे. साईबाबांची शिर्डी दुहेरी हत्येच्या घटनेने हादरली आहे. एका तासात लागोपाठ तीन ठिकाणी रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तींवर वार करण्यात आले आहेत. साई संस्थान कर्मचारी सुभाष घोडे आणि साई संस्थानचे कंत्राटी कर्मचारी नितीन शेजूळ या दोघांची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. तर कृष्णा देहरकर यांच्यावर देखील वार झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोमवारी पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका तासांच्या अंतराने तीन ठिकाणी हे हल्ले करण्यात आले आहेत. पोलिसांनी पहिल्या घटनेची दखल न घेतल्याने तसेच अपघात असल्याचं सांगून गांभीर्यान दखल घेतली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

(नक्की वाचा-  CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली)

सगळंच फुकट असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली- सुजय विखे 

या घटनेनंतर साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी जमली आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दोषी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा शब्द सुजय विखे पाटलांकडून देण्यात आला आहे. तसेच शिर्डीत सगळंच मोफत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचं सुजय विखे यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. 

(नक्की वाचा-  MPSC प्रश्नपत्रिका 40 लाखात देण्याचं आमीष; 'ती' उच्चपदस्थ महिला अधिकारी कोण? )

दुचाकीवर दोन जणांनी हा प्रकार केल्याचं उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. रस्त्यावर लुटीतून हा प्रकार घडल्याचं प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात येत आहे. आरोपींचा शोध लागत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा मयत सुभाष घोडे यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. या तिन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवप शिर्डीत तनावपूर्ण शांतता आहे. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला शिर्डीत येऊन घटनांचा माहिती घेणार आहेत. 

पाहा VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: