रिझवान शेख, प्रतिनिधी
Thane News : ठाण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात कारमध्ये दोघांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर अत्याचार केला.
ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये सामूहिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॅमिली कोर्टाच्या आवारात चार चाकी वाहनात हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची माहिती आहे. हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आली असून रवी पवार हा फरार आहे.
नक्की वाचा - 'प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवतो...', शिक्षकाने विद्यार्थिनीला रुमवर नेलं, नको ते केलं, सुरु झाला भयंकर छळ
ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली. पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली.
वाढदिवसाच्या केकमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर केला अत्याचार..
2024 मधील ऑगस्ट महिन्यात ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगमध्ये दोन तरुणांनी वाढदिवसाच्या बहाण्याने एका महिलेस बोलावले आणि केकमध्ये गुंगीचे औषध मिसळवले. ते खायला दिल्यानंतर महिलेला अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर महिलेवर दोन इसमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. इतकच नव्हे तर त्या महिलेचा अश्लील व्हिडिओ देखील तयार करून त्या महिलेला वारंवार दोघांकडून ब्लॅकमेल करण्यात येत होते. रवी पवार आणि केदार असं या दोन व्यक्तींची नावं आहेत. महिलेने दोघांच्या त्रासाला कंटाळून अतिरिक्त ठाणे नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर लगेचच ठाणे नगर पोलिसांनी हिरालाल केदार या आरोपीला अटक केले असून रवी पवार हा अद्यापही फरार आहे. ठाणे नगर पोलिसांकडून पवार येथे तपास सध्या युद्धपातळीवर सुरू आहे..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
