बहुप्रतिक्षित 18 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून 48 खासदार लवकरच दिल्लीला जातील. दरम्यान राज्यात 50 टक्क्यांहून अधिक खासदार मराठा समाजाचे असल्याचं समोर आलं आहे. तसं पाहता राज्यात नेहमीच मराठा समाजाच्या खासदारांची संख्या जास्त राहिली आहे. यावेळीही तेच चित्र पाहायला मिळालं. राज्यातील नवनिर्वाचित 48 खासदारांपैकी 26 खासदार मराठा समाजाचे तर 9 खासदार ओबीसीचे आहेत. अनुसूचित जातीचे 6 तर अनुसूचित जमातीचे चार खासदार निवडून आले आहेत.
मात्र ओबीसी हा भाजपचा परंपरागत मतदार मानला जातो. पण या वेळेस त्यात काहीसा बदल पाहायला मिळत आहे. म्हणजे महायुतीपेक्षा महाविकास
आघाडीकडून ओबीसीचे जास्त खासदार झालेले दिसताय. यंदाच्या निवडणुकीत जातीय समीकरणं निर्णायक ठरतील असा अंदाज वर्तवला जात होता. तशाच प्रकारचं चित्र महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीत दिसून आलं.
मराठा समाजाचे खासदार...
- स्मिता वाघ
- शाहु छत्रपती
- डॉ. शोभा बच्छाव
- नारायण राणे
- श्रीकांत शिंदे
- उदयनराजे भोसले
- नरेश म्हस्के
- विशाल पाटील
- सुप्रिया सुळे
- मुरलीधर मोहोळ
- श्रीरंग बारणे
- धैर्यशील मोहिते
- धैर्यशील माने
- संजय देशमुख
- अरविंद सावंत
- प्रतापराव जाधव
- राजाभाऊ वाजे
- निलेश लंके
- ओमप्रकाश रोज निंबाळकर
- डॉ. कल्याण काळे
- संदीपान भुमरे
- वसंत चव्हाण
- नागेश आष्टीकर
- संजय जाधव
- बजरंग सोनवणे
- अनुप धोत्रे
नक्की वाचा - मोदींची 3.0 टीम! मंत्र्यांच्या नव्या यादीत कोणाला मिळणार डच्चू आणि कोणाला मिळणार संधी?
ओबीसी खासदार
- रक्षा खडसे
- प्रतिभा धानोरकर
- सुनील तटकरे
- रवींद्र वायकर
- डॉ. अमोल कोल्हे
- प्रशांत पडोळे
- अमर काळे
- संजय दिना पाटील
- सुरेश म्हात्रे
खुला वर्ग
- नितीन गडकरी-ब्राम्हण
- पियूष गोयल - अग्रवाल
- अनिल देसाई - सारस्वत ब्राम्हण
अनुसूचित जातींचे खासदार
- बळवंत वानखडे
- भाऊसाहेब वाकचौरे
- प्रणिती शिंदे
- वर्षा गायकवाड
- श्यामकुमार बर्वे
- डॉ. शिवाजी काळगे
अनुसूचित जमातींचे खासदार
- भास्कर भगरे
- हेमंत सावरा
- डॉ. नामदेव किरसान
- गोवाल पाडवी
महत्त्वाचे मुद्दे...
- महाविकास आघाडीचे 26 पैकी 14 जणं निवडून आले, त्यांची टक्केवारी 54 इतकी आहे.
- महायुतीचे 11 मराठा उमेदवार जिंकल्या, त्यांची टक्केवारी 23 टक्के इतकी आहे.
- ओबीसी समाजाच्या खासदाराची टक्केवारी 19, त्यात महायुतीचे 3 आहेत. सहा जणं महाविकास आघाडीचे आहेत.
- यातील तीन खासदार खुल्या प्रवर्गातील आहेत. त्यांची टक्केवारी 6 इतकी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world