स्विगी डाइनआऊटने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांची कर्तव्य पार पाडण्यासाठी एक आकर्षक ऑफर आणली आहे. सोमवारी शहरात मतदान होणार आहे. त्यानिमित्त स्विगीने मोठ्या हॉटेलमध्ये मतदारांना आकर्षक सूट दिली आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे हा यामागचा उद्देश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईत 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. बोटाला लावलेली शाई दाखवून मुंबईकरांना जेवण्याच्या बिलात 50 टक्क्यांची सूट मिळेल. लुसी लोयू, सॅफ्रॉन अँड सोय, सान्टे स्पा कुझिन, फाऊंटन सिझलर्स, ओशन किचन फाईन डाईन, कोकम भरत एक्सलेंसा, यलो चिली बाय संजीव कपूर आणि फिशरमनस् केव- टेस्ट ऑन प्लेट या हॉटेल्समध्ये ही ऑफर असणार आहे.
(नक्की वाचा : Exclusive : 'आमचं पारडं जड', 2024 च्या निवडणूक निकालाबाबत PM मोदींची NDTV ला खास मुलाखत)
नागरिकांनी अधिकाधिक सक्रिय व्हावं आणि मतपेटीच्या माध्यमातून त्यांचा आवाज ऐकला जावा ही स्विगी डाइनाऊटची भूमिका यामुळे अधोरेखित होते. मुंबईच्या नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं आणि त्यानंतर आपल्या आवडत्या भोजनाचा आस्वाद घ्यावा, हा स्विगी डाइनआऊट आणि शहरातल्या हॉटेल्सचा मानस आहे.
(नक्की वाचा - VIDEO: थरकाप उडवणारे 3 सेकंद, पेट्रोलसाठी लागली होती वाहनांची रांग; पाहा घाटकोपरमध्ये कसे कोसळले होर्डिंग?)
या उपक्रमाबद्दल बोलताना स्विगी डाइनआऊटचे प्रमुख स्वप्नील बाजपेयी म्हणाले, "मतदान हा फक्त हक्क नाही, ती एक जबाबदारी आहे. नागरिकांनी सक्रिय व्हावं यासाठी स्विगी डाइनआऊट शहरातल्या सर्वोत्तम रेस्टॉरंट बरोबर सहभागी झाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही मुंबईकरांना मतदान करण्याचं आणि त्यानंतर तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये तुमचे आवडत्या पदार्थावर ताव मारण्याचं आवाहन करत आहोत. नागरिक त्यांच्या अधिकाराचा वापर करून देशाचं भविष्य घडवण्यात सहभाग घेतील असा आम्हाला विश्वास आहे.”
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world