जाहिरात

Maharashtra Election 2026 : मुंबई-पुण्यात किती टक्के मतदान? सर्वाधिक मतदान कोणत्या महानगरपालिकेत? पाहा यादी

एग्झिट पोलमध्ये महायुतीची सरशी असली तरी प्रत्यक्षात कोणाची सत्ता येणार हे येत्या काही तासात समोर येईल.

Maharashtra Election 2026 : मुंबई-पुण्यात किती टक्के मतदान? सर्वाधिक मतदान कोणत्या महानगरपालिकेत? पाहा यादी

Municipal corporation vote percentage : महाराष्ट्रातील पालिका निवडणुकीचं मतदान १५ जानेवारी रोजी पार पडलं. यावेळी अनेक जिल्ह्यांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. १५ जानेवारी रोजी सायंकाळी मुंबई महानगरपालिकेचे एग्झिट पोल समोर आले. यामध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटाची सरशी असल्याचं दिसून आलं. मुंबई महानगर पालिकेत तब्बल ५२.८७ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी १५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या मतदानाच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण ५५.५९ टक्के मतदान झाले असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
    
पुण्यात एकूण ५२.४२ टक्के मतदान झालं. १५ जानेवारी रोजी उशीरा याबाबतची टक्केवारी जाहीर करण्यात आली. १६३ जागांसाठी ५२.४२ टक्के इतके मतदान झाले असून एकूण ३५ लाखांपैकी १८ लाख ६२ हजार ४०८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या वेळेपेक्षा जवळपास ३.५० टक्के कमी मतदान झाल्याची माहिती आहे. २०१७ मध्ये ५५.५६ इतके मतदान झाले होते. मतदान कमी झाल्याचा फटका नेमका कुणाला बसणार पुढील काही तासात समोर येईल. 

BMC Election Result Exit Poll : बीएमसी एक्झिट पोलमध्ये भाजपची 'दौड'; ठाकरे आणि काँग्रेससाठी काय आहे Good News

नक्की वाचा - BMC Election Result Exit Poll : बीएमसी एक्झिट पोलमध्ये भाजपची 'दौड'; ठाकरे आणि काँग्रेससाठी काय आहे Good News

छत्रपती संभाजीनगरमध्ये ५९.८२ टक्के मतदान पार पडलं. परभणी महानगरपालिका निवडणूक मतदानाची अंतिम टक्केवारी ६५.९९ इतकी आहे. याशिवाय मालेगाव येथे ६७ टक्के मतदान झालं. येथे सर्वाधिक मतदान झाल्याची माहिती आहे. 

कोणत्या महानगरपालिकेत किती टक्के मतदान

कोणत्या महानगरपालिकेत किती टक्के मतदान

मुंबई - ५५ टक्के
ठाणे - ५५ टक्के
पुणे - ५४ टक्के
पिंपरी-चिंचवड - ५८ टक्के
इचलकरंजी - ७० टक्के
सांगली-मिरज - ६० टक्के
अहिल्यानगर - ६४.३५ टक्के
कल्याण-डोंबिवली - ४५ टक्के
नवी मुंबई - ४५ टक्के 
छत्रपती संभाजीनगर - ५५ टक्के
मालेगाव - ६५ टक्के
परभणी -  ६५ टक्के 
जळगाव - ५३ टक्के
नाशिक - ५५ टक्के
कोल्हापूर - ७० टक्के
वसई-विरार - ५७ टक्के
पनवेल - ५७ टक्के
भिवंडी - ३७.२१ टक्के
उल्हासनगर - ४५ टक्के
नागपूर - ५१ टक्के
अमरावती - ५५ टक्के
चंद्रपूर - ५२ टक्के
अकोला - ५५ टक्के
धुळे - ५५ टक्के
लातूर - ५५ टक्के
मीरा-भाईंदर -५० टक्के
अकोला - ५५.६१ टक्के
सोलापूर - ६० टक्के
जालना - ७० टक्के
नांदेड - ६५ टक्के


 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com