'भटकती आत्मा मोदी कोणाला म्हणाले ते कळालं नाही' अजित पवारांचा अजब दावा

जेष्ठ नेत्याबद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे आहे असे ते म्हणाले. मात्र त्याच वेळी मोदींनी केलेला भटकती आत्माच्या उल्लेखाची आठवण अजित पवारांना करून देताच, त्यांनी अजिब दावा करत त्यावर अधिक बोलणे टाळले.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका केले. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही त्यामुळे आक्रमक झाले आहेत. खोत यांच्या विरोधात कारवाईची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सदा भाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध करत, त्यांना थेट फोन लावून कान उघाडणी केली आहे. अशी माहिती स्वत: अजित पवार यांनी दिली. जेष्ठ नेत्याबद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे आहे असे ते म्हणाले. मात्र त्याच वेळी मोदींनी केलेला भटकती आत्माच्या उल्लेखाची आठवण अजित पवारांना करून देताच, त्यांनी अजिब दावा करत त्यावर अधिक बोलणे टाळले.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रचंड राग आला. त्यांनी थेट खोत यांना फोन लावला. तुम्ही जे वक्तव्य केलं आहे ते चुकीचे आहे. तुमचे बोलणे महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेले नाही. त्यामुळे अशी वक्तव्य पुन्हा करू नका. असा दम अजित पवारांनी भरला. याची माहिती त्यांनीच माध्यमाना दिली. प्रत्येकाने बोलताना तार्तम्य बाळगले पाहीजे. वाचाळविरांनी कुठे तरी थांबले पाहीजे असंही ते म्हणाले. मतभेद असतील. तरही बोलण्याची एक पद्धत असते. त्याच्या मर्यादा असल्या पाहीजेत असं अजित पवार म्हणाले. शिवाय खोत जे काही बोलले ते अतिशय निंदनिय आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी असं ही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'छत्रपतींचा पुतळा कोसळला फडणवीसांनी माफी का मागितली नाही?' ठाकरेंचा पलटवार

त्यांच्या या वक्तव्यावरून अजित पवारांना अजूनही शरद पवारांची किती काळजी आहे हे दिसून येते. त्यामुळेच की काय पत्रकारांनी त्यांना आणखी एक प्रश्न विचारला. तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवारांवर टीका करताना त्यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. त्यावेळी तुम्हा आक्षेप किंवा निषेध का केला नाही? मोदींच्या यावक्तव्याला विरोध का केला नाही असा प्रश्न विचारला. अनपेक्षित पणे आलेल्या या प्रश्नाला अजित पवारांनी अजब उत्तर दिले. त्यावेळी पंतप्रधानांनी भटकती आत्मा नेमके कोणाला डोळ्यासमोर ठेवून म्हटले होते. हे मला ताबडतोब कळालं नव्हतं. त्यामुळे  मी ताबडतोब त्याबद्दल काही बोललो नाही. म्हणजे मोदी नक्की कोणाला भटकती आत्मा म्हणाले हे अजित पवारांना कळालचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ठाकरे गटाचा वचनमाना जाहीर; उद्धव ठाकरेंनी काय दिलीत आश्वासने?

 वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शरद पवारांवर झालेल्या टीके बद्दल त्यांनी माध्यमां बरोबर संवाद साधला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या पाच गॅरंटीवरही भाष्य केलं. आधी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. आता 3000 हजार देणार असं सांगत आहे. राज्याचे एकूण बजेट पाहाता ज्या गॅरंटी मविआने दिल्या आहेत त्या पुर्ण करणे शक्य नाही असे अजित पवार यावेळी म्हणाले. महायुतीने या सगळ्या योजना 75 हजार कोटींपर्यंत घेऊन गेलो होतो. आता ते देत असलेली योजनांची आश्वासने पाहाता  3 लाख कोटी रूपये लागतील असे पवार म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - शिंदे आणि राज यांच्यात काय बिनसलं?  मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच तोंड उघडलं

दरम्यान नवाब मलिक यांच्या प्रचाराला आपण जाणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार आपण करणार असल्याचे ते म्हणाले. शिवाय राज्यात जास्तीत जास्त सभा घेण्यावर आपला भर असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.पंतप्रधान मोदी बारामतीत सभा घेणार नाहीत. ज्या ठिकाणी अधिक गरज असेल त्याच ठिकाणी मोदींच्या सभा होतील असेही त्यांनी सांगितले. सध्या प्रचारात नुसतं खाऊ,भाऊ, माऊ असं सुरू आहे. असं करून कसं चालेल असं ही ते म्हणाले. 

Advertisement