जाहिरात

शिंदे आणि राज यांच्यात काय बिनसलं?  मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच तोंड उघडलं

एकनाथ  शिंदे यांना याबाबत म्हटलं की,  भांडूप विधानसभेच्या जागेबाबत आमचं राज ठाकरेंशी बोलणं झालं होतं. राज ठाकरेंनी म्हटलं होतं अमित ठाकरे भांडुपमधून निवडणूक लढवतील, आम्ही त्याबाबत सकारात्मक विचारही केला होता.

शिंदे आणि राज यांच्यात काय बिनसलं?  मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच तोंड उघडलं

माहीम विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमने-सामने आले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे तर शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतील बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेवर महायुतीविरोधात निवडणूक लढण्याची वेळ का आली? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र मनसे आणि शिवसेनेतील विसंवादामुळे ही वेळ आल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यातून समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.  

एकनाथ  शिंदे यांना याबाबत म्हटलं की,  भांडूप विधानसभेच्या जागेबाबत आमचं राज ठाकरेंशी बोलणं झालं होतं. राज ठाकरेंनी म्हटलं होतं अमित ठाकरे भांडुपमधून निवडणूक लढवतील, आम्ही त्याबाबत सकारात्मक विचारही केला होता. जागावाटपांच्या चर्चांदरम्यान मी त्यांच्याशी बोललो होतो आणि त्यांची योजना काय आहे हे विचारले होते.

(नक्की वाचा-  मुंबईतील तीन मोठ्या उमेदवारांच्या पायाला दुखापत; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रणनिती बदलली)

त्यावेळी त्यांनी मला सांगितले की तुम्ही आधी महायुतीसाठी गोष्टी ठरवा त्यानंतर आपण बघू. मात्र मध्यंतरी काय झालं माहीत नाही त्यांनी थेट उमेदवार जाहीर केले. सदार सरवणकर यांची उमेदवारी देखील जारी झाली होती. अमित ठाकरेंसाठी मग मी सदा सरवणकरांशी देखील बोललो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

पुढे मुख्यमंत्री शिंदे यांनी  सांगितलं की, सदा सरवणकर यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी म्हटलं की,  जर थेट लढत झाली तर अमित ठाकरे माहीममधून जिंकू शकणार नाहीत. तिरंगी लढत झाली तर दोघांपैकी एक जिंकेल आणि अमित ठाकरेंना याद्वारे संधी मिळू शकते. मी सरवणकर यांना राजला भेटायला सांगितले, पण राज ठाकरेंनी भेट दिली नाही. शिवडीत आम्ही बाळा नांदगावकर यांच्या विरोधातही उमेदवार उभा केलेला नाही, याचीही आठवण एकनाथ शिंदे यांनी करुन दिली. 

(नक्की वाचा-  लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार, शिंदेनी दिली 10 मोठी आश्वासनं)

मनसे आणि शिवसेनेत नेमकं काय घडलं?

भांडूप आणि माहीम या दोन्ही जागा शिवसेनेच्या कोट्यातील आहेत. त्यामुळे मनसेने शिवसेनेशी बोलणी करणे गरजेचं होतं. मात्र शिवसेना आणि मनसेमध्ये नंतर काही बोलणी झालं नसल्याचं एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यातून समोर येत आहे. त्यात राज ठाकरे यांची भाजपसोबत याबाबत बोलणी झाल्याच्याही चर्चा समोर आल्या होत्या  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: