माजी आमदार पप्पू कलानी यांनी मतदानाच्या दिवशी आमदार कुमार आयलानी यांच्या ऑफिसबाहेर दबंगगिरी केली होती. ती त्यांना भोवणार असं दिसत आहे. याप्रकरणी कुमार आयलानी यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात कलानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कलानी यांच्या विरोधात कारवाई होणार हे निश्चित आहे. विधानसभा निवडणुकीत कुमार आयलानी यांच्या विरोधात पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी मैदानात उतरले होते. उल्हासनगर हा एकेकाळी पप्पू कलानी यांचा गड होता. मात्र त्याला भाजपने आता खिंडार पाडले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान झाले होते. त्या दिवशी पप्पू कलानी हे समर्थकांसह आमदार कुमार आयलानी यांच्या ऑफिसबाहेर आले. ऑफिसच्या बोर्डावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो झाकला नसल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी तो फोटो काढण्यास कार्यकर्त्याला सांगितलं. यावेळी कलानी हे मिरचीभजीचा अस्वाद घेत होते. त्यावेळचा त्यांचा व्हिडीओ ही व्हायरल झाला होता.
ट्रेंडिंग बातमी - ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? पराभूत उमेदवारांच्या बैठकीत काय घडलं?
त्या वेळी कुमार आयलानी तिथे होते. त्यांना पाहून कलानी यांनी काही इशारे ही केले. हे पाहून एक महिला कार्यकर्ता त्यांना भिडली होती. पण कुमार आयलानी यांनी तिला मागे खेचलं होतं. या प्रकारानंतर कुमार आयलानी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याच तक्रारीची दखल घेत अखेर उल्हासनगर पोलिसांनी पप्पू कलानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र यातली सगळी कलम अदखलपात्र आणि जामीनपात्र असल्यानं त्यांना अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ट्रेंडिंग बातमी - सर्वात मोठा पक्ष मात्र शिंदेंवर भिस्त, भाजपसाठी एकनाथ शिंदे का महत्त्वाचे?
उल्हासनगर विधानसभा मतदार संघात भाजपचे कुमार आयलानी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओमी कलानी हे मैदानात होते. या निवडणुकीत आयलानी यांनी बाजी मारली आहे. त्यांनी ओमी कलानी यांचा 30 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. या पप्पू कलांनी यांच्यासाठी मोठा धक्का होता. कलानी यांचा उल्हासनगर हा गड राहीला आहे. ते या मतदार संघातून निवडून गेले आहेत. शिवाय त्यांच्या पत्नीनेही या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र त्यांच्या मुलाला या मतदार संघातून निवडून येता आले नाही. त्यांचा कुमार आयलानी यांनी पराभव केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world