जाहिरात

'नाना पटोलेंनी आमची संधी नाकारली, त्यांना जागा दाखवू', आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा इशारा

काँग्रेसला मतांसाठी आंबेडकरी समाज हवा असतो. राजकारणात संधी देताना त्यांना याचा विसर पडतो, असा आरोप आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे. 

'नाना पटोलेंनी आमची संधी नाकारली, त्यांना जागा दाखवू', आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा इशारा
मुंबई:

भंडारा विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसमधील आंबेडकरी विचारधारा असलेल्या उमेदवाराला मिळणे अपेक्षित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंबेडकरी कार्यकर्त्याला संधी दिली नाही. काँग्रेसला मतांसाठी आंबेडकरी समाज हवा असतो. राजकारणात संधी देताना त्यांना याचा विसर पडतो, असा आरोप आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे. 

 ('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भंडारा येथे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते परमानंद मेश्राम, प्राचार्य पूरण लोणारे, प्राणहंस मेश्राम, अ‍ॅड. निलेश डहाट, प्रज्ञा नंदेश्वर, भीमराव मेश्राम यांनी भंडारा येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. नाना पटोळे यांच्यावर ताशेरेही ओढले. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध नोंदविताना परमानंद मेश्राम म्हणाले, पटोळे अनेक दशकांपासून आंबेडकरी समाजविरोधी भूमिका घेत आहेत.  इतक्या वर्षांनंतरही आंबेडकरी समाज पटोलेंचे षडयंत्र समजू शकला नाही. जगाने दखल घेतलेल्या खैरलांजी हत्याकांडावेळी पटोले यांनी खैरणा ते खैरलांजी अशी पदयात्रा काढून आंबेडकरी समाजाविरोधी भूमिका घेतली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

( नक्की वाचा : काँग्रेस नेत्यांच्या मुलींची वडिलांच्या CM पदसाठी फिल्डिंग, पटोलेनंतर वडेट्टीवारांच्या मुलीचीही बॅटिंग )
 

काँग्रेसला आंबेडकरी समाजाची मते हवी आहेत. परंतु, या प्रवर्गाला नेतृत्व देण्याची संधी मिळते तेव्हा काँग्रेस ती नाकारते. डोक्यावर संविधान ठेवून आंबेडकरी समाज काँग्रेसला साथ देईल, असा भ्रम काँग्रेसला झाला आहे. परंतु, आमची संधी नाकारणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशाराही मेश्राम यांनी दिला. 

भंडारा विधानसभा क्षेत्रात अनुसूचित जाती प्रवर्गाचे मतदार 90 हजारांपेक्षा अधिक आहेत. परंतु, आंबेडकरवादी विचारधारा असलेल्या व्यक्तीला काँग्रेस उमेदवारी देत नाही. फक्त जातीय राजकारण करून विशिष्ट जातीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले जवळ करतात. अशा जातीयवादी नेत्यांना समाजाने त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहनही मेश्राम यांनी केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com