जाहिरात

Delhi Election Result: काँग्रेस नेत्यानं 12 वर्षांनी घेतला आईच्या पराभवाचा बदला, केजरीवालांना शिकवला धडा

Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील हा सर्वात मोठा निकाल आहे. या निकालात आणखी एक अर्थ लपला आहे.

Delhi Election Result: काँग्रेस नेत्यानं 12 वर्षांनी घेतला आईच्या पराभवाचा बदला, केजरीवालांना शिकवला धडा
मुंबई:

Delhi Election Result 2025 : नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार प्रवेश वर्मा यांनी आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील हा सर्वात मोठा निकाल आहे. या निकालात आणखी एक अर्थ लपला आहे. या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित यांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं घेत केजरीवाल यांच्या पराभवात निर्णायक योगदान दिलं आहे. संदीप स्वत: पराभूत झाले, पण त्यांनी  त्यांच्या आई आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या पराभवाचा 12 वर्षांनी बदला घेतला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शीला दीक्षित यांनी 1998 आणि 2013 या कालावधीमध्ये या मतदारसंघाच्या आमदार होत्या. 2013 साली 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या चळवळीतून पुढं आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री दीक्षित यांना आव्हान दिलं. त्या निवडणुकीत केजरीवाल विजयी झाले. शीला दीक्षित यांच्या पराभवासह काँग्रेसला दिल्लीतील सत्तता गमवावी लागली. 

12 वर्षांनी बदलली परिस्थिती

बारा वर्षांनी अरविंद केजरीवाल हे गोलिएथ होते. तर भाजपाचे 47 वर्षांचे उमेदवार हे डेव्हिड ठरले. पण, डेव्हिडच्या विजयात संदीप दीक्षित यांचं योगदान महत्त्वाचे ठरले. वर्मा यांनी केजरीवाल यांचा 4,089 मतांनी पराभव केला. तर तिसऱ्या क्रमांकावरच्या दीक्षित यांनी 4,089 मतं मिळवली. याचाच अर्थ आप आणि काँग्रेसनं ही निवडणूक एकत्र लढवली असती तर कदाचित अरविंद केजरीवाल यांचा या निवडणुकीत विजय होण्याची शक्यता होती.

Delhi Election Result: अरविंद केजरीवालांचं आता काय होणार? 'आप' च्या पराभवाचे 7 प्रमुख परिणाम

( नक्की वाचा : Delhi Election Result: अरविंद केजरीवालांचं आता काय होणार? 'आप' च्या पराभवाचे 7 प्रमुख परिणाम )

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दीक्षित यांनी केजरीवाल यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा दिल्ली काँग्रेसनं उचलून धरला पाहिजे, अशी त्यांची आग्रही भूमिका होती. त्यांची बहीण लतिका यांनीही संदीप यांना प्रचारात साथ दिली. शीला दीक्षित आजही दिल्लीवासियांच्या मनात आहेत. दिल्लीच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे, असा प्रचार लतिका यांनी केला होता. 

विशेष म्हणजे केजरीवाल यांचा पराभव करुन 'जायंट किलर' ठरलेले प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे वडील साहेबसिंह वर्मा हे 1996 ते 1998 या कालावधीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री होते. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: