जाहिरात

'तावडेंकडे पैसे सापडले नाहीत, त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला' फडणवीसांकडून पाठराखण

विनोद तावडे यांची देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली आहे. तावडे हे केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याकडे पैसे नव्हते असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

'तावडेंकडे पैसे सापडले नाहीत, त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला' फडणवीसांकडून पाठराखण
नागपूर:

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैस वाटप करताना रंगे हाथ पकडल्याचा दावा बहुजन विकास आघाडीने केला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. विरोधकांनी तावडेंसह भाजपला झोडपून काढले. ठाकरेंनी तर हा वोट जिहाद असल्याचं म्हटलं. तर काँग्रेसने तावडेंच्या अटकेची मागणी केली. दुसरीकडे तावडे यांना आपण कोणतेही पैसे वाटले नाहीत. आपण केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होतो असं स्पष्टीकरण तावडे यांनी दिलं. त्यानंतर दिवसभर या विषयावर काही न बोललेले उपमुख्यमंत्री रात्री मात्र या विषयावर बोलले. त्यांनी तावडे यांची पाठराखण केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या प्रकरणात विनोद तावडे यांची देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली आहे. तावडे हे केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी पैसे ही कोणाला वाटले नाहीत. शिवाय तिथं पैसेही सापडले नाहीत. उलट विनोद तावडे यांच्यावरच हल्ला करण्यात आला. आमचे उमेदवार राजन नाईक यांनाही मारहाण करण्यातच आली. कार्यकर्त्यांनाही मारण्यात आलं असं फडणवीस यांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - हा 'नोट जिहाद' आहे का? ठाकरेंचा शिंदे-पवार-फडणवीसांना सवाल

निवडणुकीच मविआला पराभव दिसत आहे. त्यासाठी त्यांनी तयार केलेली ही इको सिस्टम आहे. त्यासाठी त्यांनी ही चाल चालली आहे असा आरोप फडणवीस यांनी या निमित्ताने केला. हा हल्ला प्लॅन करून केला होता. असंही ते म्हणाले. तावडे यांच्याकडे पैसे नव्हते. किंवा त्यांनी कोणतेही पैसे वाटलेले नाहीत. तिथं असं काही ही झालेलं नाही असं स्पष्टीकरणही देवेंद्र फडणवीस दिलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - "माझी चूक झाली, मला इथून सोडवा, विनोद तावडेंचा फोन", हिंतेंद्र ठाकूरांचा दावा 

माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. असंही तावडे म्हणाले. त्याच बरोबर राहुल गांधी, सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत  निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी या पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी केली. दरम्यान तिथे झालेल्या घटनेचे तीन एफआयआर दाखल झाल्याचं तावडे म्हणाले. यात पैशा बाबतचा एकही एफआयआर नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com