विधानसभा निवडणूक ऐन रंगात आली आहे. प्रत्येक उमेदवाराने जिंकण्यासाठी जोर लावला आहे. मतदार संघाचा विकास, गेल्या पाच वर्षातील कामं, पुढच्या पाच वर्षात काय करणार याचा रोडमॅप उमेदवार मतदारांना सांगत आहेत. काही ठिकाणी आरोप प्रत्यारोपही होत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न असेल तर काही ठिकाणी पाण्याचा मुद्दा निवडणूक प्रचाराच्या केंद्र स्थानी आहे. पण राज्यातला एक मतदार संघ असा आहे तिथे या मुद्द्यांपेक्षा तिथे निवडणूक लढत असलेल्या उमेदवाराच्या वयाचा मुद्दा चर्चेत आहे. विरोधी उमेदवारानेही हाच मुद्दा प्रचाराचा मुद्दा केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विदर्भातील हिंगणा हा विधानसभा मतदार संघ आहे. या मतदार संघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षात थेट लढत होत आहे. भाजपकडून समीर मेघे हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी दोन वेळा या मतदार संघातून विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्री रमेश बंग हे निवडणूक लढत आहेत. बंग हे माजी मंत्री असून त्यांनी दोन वेळा या मतदार संघातून या आधी विजय मिळवला आहे. मात्र बंग यांचे वय सध्या चर्चेचा विषय ठरला आहेय. रमेश बंग हे वयाच्या 83 व्या वर्षी विधानसभेची निवडणूक लढत आहेत. शिवाय ते आजारीही असतात अशी ओरड विरोधकांनी केली आहे. त्यामुळे प्रचारात हा मुद्दा भाजपने चांगलाच लावून धरला आहे.
ट्रेंडिंग बातमी - सातारा जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार?
रमेश बंग हे वयाच्या 83 व्या वर्षी निवडणूक लढत आहेत. या विरोधात भाजप उमेदवार समीर मेघे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. बंग हे जेष्ठ नेते आहेत. त्यांच्याबाबत आपल्याला आदर आहे. ते आपल्याला पितृतुल्य आहेत. मी त्यांची टिंगल करत नाही. पण वस्तूस्थिती ही पाहणे गरजेचे आहे. त्यांचे वय सध्या 83 वर्ष आहे. त्यांची प्रकृती ही ठिक राहत नाही, हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. फक्त कुणाला निवडून यायचे वाटते म्हणून लोक मते देत नाहीत असंही ते म्हणाले. शेवटी निवडून आल्यानंतर मोठी जबाबदारी असते, असं ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'आयुष्यात कधी संविधान वाचलं नाही', राहुल गांधींचा PM मोदींना टोला
आमदार झाल्यानंतर दिवसातून कितीतरी वेळा मंत्रालयाचे सात मजले चढ उतर करावे लागतात. मत्र्यांसोबत बैठकी साठी दोन दोन ,तीन तीन तास वाट पहावी लागते. काही वेळा उपाशीपोटी राहून बैठकीसाठी प्रतीक्षा करावी लागते. थांबावे लागते. सगळ्या कामांचा पाठ पुरावा करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आमदार बनणे सोपे असेलही, पण त्यानंतरची जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. असं म्हणत समीर मेघे यांनी हे काम बंग यांच्याकडून होवू शकते का असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रचारातही मेघे बंग यांच्या वयाचा आवर्जून उल्लेख करत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांनी जाहीर केली मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका, उद्धव ठाकरेंचे टेन्शन का वाढले?
दरम्यान बंग यांच्या वयाचा मुद्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं की बंग साहेब पुन्हा इथे उभे राहिले. मी महाभारतात ऐकले होते की पार्थाने शस्त्र ठेवले तर श्रीकृष्णाने त्यांना गीता सांगितली. आणि त्यांनी पुन्हा शस्त्र हाती घेतले. आता या पार्थाला कुणी गीता सांगितली मला माहित नाही, की ठेवलेले शस्त्र त्यांनी परत हातात घेतले. बहुतेक यांची गीता सावनेरमधून आली असावी. समीर मघे पण, काही काळजीचे कारण नाही. बंग साहेब हे आपले मित्रच आहे. त्यामुळे, त्यांच्या वयाचा आपण मान ठेवू. पण आता काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. हिंगणा मतदार संघामध्ये आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून समीर भाऊ निवडून येतील, असं फडणवीस म्हणाले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world