जाहिरात

'हिंदूंनीच तुम्हाला हरवलं' वोट जिहादवरून आव्हाडांनी भाजपला सुनावलं

'भाजपने जे जातीचे आणि धर्माचे किळसवाणं राजकारण केलं त्याला हिंदू कटाळला आहे. तो वर्ग भाजपपासून दूर गेला. येवढेच नाही तर अयोध्येत ही भाजपचा पराभव केला.'

'हिंदूंनीच तुम्हाला हरवलं' वोट जिहादवरून आव्हाडांनी भाजपला सुनावलं
मुंबई:

भाजपकडून वोट जिहादचा आरोप केला जातो. त्याची चांगलीच चिरफाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हा यांनी चांगलीच चिरफाड केली. शिवाय कुठल्या मतदार संघात काय घडलं याबाबचे थेट प्रश्नच त्यांनी भाजपला केले. आयोध्येत पराभव कसा झाला याचे आधी आत्मपरिक्षण करा असा सल्लाही आव्हाड यांनी दिला. NDTV मराठीनं 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वोट जिहाद या भाजपच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. भाजप नेहमी म्हणत आहे की वोट जिहाद झालं. मग चंद्रपूरमध्ये किती मुस्लिम आहेत? रामटेक, नाशिक, दिंडोरी मतदार संघात किती मुस्लिम आहे? असा प्रश्न त्यांनी भाजपला यावेळी केला. मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात मविआला मतदान झालं. ती तिथल्या जनतेची भावना होती. लोकसभेला एक नाही तर 31  जागा आम्ही जिंकल्या आहेत. तुम्हाला हिंदूंनी हरवलं आहे असा हल्लाबोल आव्हाड यांनी भाजपवर केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - NDTV Conclave:'आम्ही ठाकरेंच्या डिझाईनला बळी पडलो' प्रकाश आंबेडकर थेट बोलले

भाजपने जे जातीचे आणि धर्माचे किळसवाणं राजकारण केलं त्याला हिंदू कटाळला आहे. तो वर्ग भाजपपासून दूर गेला. येवढेच नाही तर अयोध्येत ही भाजपचा पराभव केला. तिथे तर एका दलित समाजातील उमेदवाराने भाजपचा पराभव केला. त्यामतदार संघात तरी किती मुस्लिम आहेत? अशी विचारणाच आव्हाड यांनी यावेळी केली. शिवाय भाजपचा वोट जिहादचा मुद्दाच त्यांनी खोडून काढला. वोट जिहाद नाही तर हिंदूंनीच भाजपला हरवले आहे हे त्यांना आवर्जून सांगितले. भाजपची चड्डी जरी फाटली तरी ती मुस्लिमांनी फाडली असंही ते बोलतील. हा रडीचा डाव आहे. असा डाव खेळू नका असेही आव्हाड यावेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Maharashtracha Jahirnama : 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र

दरम्यान विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 160 जागा जिंकेल. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल असा दावा ही त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 86 जागांवर लढत आहेत. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा आकडा लवकरच फायनल होईल असेही ते यावेळी म्हणाले. आमच्याकडे जवळपास 38 आमदार परत येण्याच्या तयारीत होते. पण ज्या ठिकाणी आमची अडचण होती त्या ठिकाणच्याच लोकांना पक्षात प्रवेश दिल्याचे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.  

( मुख्यमंत्रिपदाचे 3 चेहरे कोणते? संजय राऊतांनी NDTV मराठीच्या जाहीरनाम्यात सांगितली 'ती' नावं! )

यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांच्या घर वापसीला विरोध दर्शवला आहे. अनेक आमदार नेते हे पुन्हा शरद पवारांकडे परत येत आहेत. मात्र अजित पवार परत येणार असतील तर त्याला आपला विरोध असेल असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले. गेल्या 30  वर्षापासून मी अजित पवारांना पाहत आहे. त्यांचे शरद पवारांवर कधीच प्रेम नव्हते. घरातल्यानाही ते कधी समजले नाही. पण मी बाहेरचा होता. त्यामुळे त्यांचं नातं किती घट्ट आहे हे मला समजले होते,  असेही ही यावेळी आव्हाड म्हणाले.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: