जाहिरात

Satara news: अभिजीत बिचुकले हरले पण मतं मिळवण्याचे जुने रेकॉर्ड मोडले! नगराध्यक्षपदासाठी किती मतं मिळाली?

मात्र सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी आपली दखल घेण्या इतपत मते मिळवली आहे.

Satara news: अभिजीत बिचुकले हरले पण मतं मिळवण्याचे जुने रेकॉर्ड मोडले! नगराध्यक्षपदासाठी किती मतं मिळाली?
  • अभिजित बिचुकले सातारा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून चौथ्या क्रमांकावर राहिले
  • या निवडणुकीत बिचुकले यांनी 2772 मतं मिळवून अपक्ष उमेदवारांमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे
  • भाजपच्या अमोल मोहिते यांनी नगराध्यक्षपदासाठी 57587 मतांनी विजय मिळवला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
सातारा:

राहुल तपासे 

अभिजीतच बिचुकले हे नेहमीच चर्चेत असतात. त्यात निवडणूक म्हटली की त्यांची सर्वांनाच आठवण येते. त्याला कारणही तसेच आहे. बिचुकले हे कोणती ही निवडणूक लढण्याचं सोडत नाहीत. मग ती लोकसभा असो की विधानसभा ते निवडणुकीच्या मैदानात उतरतात. ते आपल्या कृतीने सर्वाचं लक्ष ही वेधून घेतात. यावेळी ही तसचं घडलं. त्यांनी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नशिब अजमावून पाहीले. सातारा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. या निवडणुकीत त्यांचा नेहमी प्रमाणे पराभव झाला. पण त्यांनी चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली. शिवाय आधी त्यांनी मिळालेल्या मतांचे रेकॉर्डी त्यांनी तोडले. त्यामुळे हा पराभव ही त्यांच्यासाठी खास म्हणावा लागेल. 

सातारा नगराध्यक्षपदासाठी एकूण 9 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात भाजपच्या अमोल मोहिते यांनी बाजी मारली. त्यांना 57 हजार 587 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुवर्णादेवी पाटील राहील्या. त्यांना 15 हजार 555 मतं मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार  शरद काटकर राहीले. त्यांना 3 हजार 900 मतं मिळाली. तर चौथ्या क्रमांकावर अभिजित बिचुकले राहीले त्यांना जवळपास 2 हजार 772 मतं मिळाली. एकूण सहा अपक्ष उमेदवार हे मैदानात होते. त्यात बिचुकले यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. चार अपक्ष उमेदवारांना त्यांच्या पेक्षा कमी मतं मिळाली. 

नक्की वाचा - BJP News: मालवणमध्ये हार, चव्हाणांचा नारायण राणेंवर 'प्रहार'!, पराभवानंतर रविंद्र चव्हाणांनी राणेंना सुनावलं

या निवडणुकीत अभिजीत बिचुकले यांना किती मतं मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत बिचुकलेंनी अनपेक्षित कामगिरी केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांनी चौथा क्रमांकाची मतं मिळवली आहेत. अपक्ष उमेदवारांच्या यादीत तर त्यांनी 2,773 मते मिळवून दुसरे स्थान मिळवले आहे. याआधी त्यांनी बारामती मतदारसंघातून नशीब आजमावले होते. मात्र तिथे त्यांना केवळ 68 मतांवर समाधान मानावे लागले होते. तसेच सातारा-जावळी मतदारसंघात त्यांना 529 मते मिळाली होती. वरळीतूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तिथे ही त्यांचा टीकाव लागला नव्हता. 

नक्की वाचा - Kalyan News: आधी एकमेकांना फुटेपर्यंत मारले, मग गळ्यात गळे घातले!, ठाकरे गटात तुफान राडा

मात्र सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी आपली दखल घेण्या इतपत मते मिळवली आहे. त्यामुळे साताऱ्यात भाजपच्या विजया पेक्षा बिचूकलेंना मिळालेल्या मतांची चर्च जास्त असल्याचं दिसून येत आहे. त्यांना मिळालेली ही मतं आतापर्यंतच्या मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचाच रेकॉर्ड या निवडणुकीत मोडला आहे. साताऱ्याची निवडणूक लढण्या आधी बिचूकले यांनी अनेक आश्वासनं साताराकरांना दिली होती. त्याची ही मोठी चर्चा झाल्याचं दिसून आलं होतं. आता त्यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर बिचूकलेंची पुढची भूमीका काय हे पाहावं लागणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com