लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील 21 राज्यांत 102 जागांवर आज मतदान पार पडलं. सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवला. देशभरातील जवळपास 1600 उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद झालं आहे. 45 दिवसांनंतर या उमेदवारांचा निकाल स्पष्ट होणार आहे.
देशभरात सरासरी 60 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 77.57 टक्क्यांची नोंद झाली आहे. तर राजस्थानमध्ये सर्वात कमी 50.27 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये 65.08 टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तामिळनाडूतील सर्व 39 जागांवर आज मतदान पार पडलं. तामिळनाडूमध्ये 63.20 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
6 जिल्ह्यांमध्ये झालं शून्य टक्के मतदान! कारण काय?
पश्चिम बंगालमधील कूचबिहार मतदारसंघात हिंसेमुळे मतदान काही वेळ प्रभावित झालं होतं. तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हिंसाचार, मतदारांना धमकावणे अशा तक्रारी दाखल केल्या आहेत. छत्तीसगडमधील बीजापूर जिल्हातील नक्षलवाद्यांनी एक आयईडी स्फोट घडवून आणला. यामध्ये एक सीआरपीएफ जवानही जखमी झाल्याची माहिती आहे.
भुजबळांनी माघार घेताच गोडसे अॅक्शन मोडमध्ये, उमेदवारीबद्दल म्हणाले....
देशात कुठे किती मतदान? (अंदाजे आकडेवारी)
- महाराष्ट्र- 55.29 टक्के
- उत्तर प्रदेश - 57.61 टक्के
- पश्चिम बंगाल - 77.57 टक्के
- बिहार -47.49 टक्के
- तामिळनाडू - 62.19 टक्के
- छत्तीसगड - 63.41 टक्के
- मध्य प्रदेश - 63.33 टक्के
- उत्तराखंड - 53.64 टक्के
- राजस्थान- 50.95 टक्के
- जम्मू आणि काश्मीर - 65.08 टक्के
- अंदमान आणि निकोबार - 56.87 टक्के
- अरुणाचल प्रदेश - 63.46 टक्के
- आसाम - 71.38 टक्के
- लक्षद्वीप - 59.09 टक्के
- मणिपुर - 68.62 टक्के
- मेघालय - 70.26 टक्के
- मिझोराम - 54.18 टक्के
- नागालँड - 56.77 टक्के
- पुद्दुचेरी - 73.25 टक्के
- सिक्किम - 68.06 टक्के
- त्रिपुरा -79.90 टक्के
कुठे-कुठे पार पडलं मतदान?
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5, तामिळनाडूमधील सर्व 39, राजस्थानमधील 25 पैकी 12, उत्तर प्रदेशातील 80 पैकी 8 आणि मध्य प्रदेशातील 6 मतदारसंघात मतदान झालं. आसाममधील 5, उत्तराखंड 5, बिहार 4, बंगाल 3, मेघालाय, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी 2 मतदारसंघात मतदान पार पडलं. तर पुदुच्चेरी, मिझोराम, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, लक्षद्वीप, सिक्कीम, त्रिपूरा, नागालँड, अंदमान आणि निकोबारमधील प्रत्येकी 1 जागेवर मतदान पार पडलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world