
Vote Jihad : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Elections) व्होट जिहादचा आरोप करणाऱ्या भाजपानं आता या कामासाठी कोट्यवधी रुपयांचं फंडिग झाल्याचा आरोप केला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मालेगावमधील बँकांमधील बेनामी खात्यांचा हवाला देत हा आरोप केला आहे. या खात्यामध्ये हवालाच्या माध्यमातून जवळपास सव्वाशे कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यामध्ये आल्याचा आणि नंतर वेगवेगळ्या खात्यांमध्ये हे पैसे ट्रान्सफर झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात मालेगावमधील छावणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. एनडीटीव्हीशी खास बातचित करताना त्यांनी हे पैसे कसे येतात हे सांगितलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेस पक्षावर आरोप
किरीट सोमय्या यांनी सांगितलं की, 'राहुल गांधी यांची काँग्रेस मराठी मुस्लीम सेवा संघटनेचा वापर केला आहे. त्यांच्या माध्यमातून 400 NGO संलग्न असल्याचा दावा आहे. ते हजारो सभा तसंच संमेलन घेत आहेत. नाना पटोले उलेमा बोर्डाला उत्तेजन देत आहेत. त्यांच्या 17 मागण्या मान्य करत आहेत. त्यांच्याकडं पैसा कसा येतो, याचा आम्ही शोध घेत आहोत. '
सोमय्यांनी सांगितली पूर्ण प्रोसेस
सोमय्यानं या संपूर्ण पद्धतीची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, 'मालेगाव कट्टर मुस्लीम हलचालींचा अड्डा बनला आहे. तिथं सिराज आणि मोईल फर्जी बँक खाते उघडतात. ते 17 हिंदू शेतकऱ्यांचे कार्ड चोरतात आणि त्यांच्या नावावं बँक अकाऊंट उघडतात. देशभरातील 175 बँकेच्या शाखांमध्ये चार दिवसांमध्ये 125 कोटींची रक्कम जमा झाली आहे.'
त्यांनी पुढं सांगितलं की, ' या बँकांमधील खात्यांचा पैसा हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशासह वेगवेगळ्या ठिकाणी जमा होतो. हे पैसे 17 फर्जी अकाऊंटमध्ये आहेत. त्याचबरोबर आणखी काही हवाला अकाऊंट आहेत. त्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जातात. त्यामधील 121 कोटी रुपये काढण्यात आले आहेत.'
( नक्की वाचा : Vote Jihad : 'व्होट जिहाद'च्या आरोपांना उत्तर देताना ओवैसींना आठवले पूर्वज, म्हणाले... )
कर चुकवण्याचं प्रकरण नाही
किरीट सोमय्या यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, 'चार दिवसांमध्ये हे सर्व अकाऊंट उघडण्यात आली आहेत. हिंदू शेतकऱ्यांच्या नावावर दोन मुस्लिम खातं उघडतात. एका महिन्यामध्ये ते परत जातात. त्यामुळे हा टॅक्स चोरीचा विषय नाही.'
सात राज्यांमधील 175 ब्रँचमध्ये कर चोरीचा हा विषय असू शकत नाही. त्यांचं इतकं जाळं नाही. या सर्वांचा मास्टरमाईंड आहे. एक व्यक्ती मास्टरमाईंड आहे, तोच हे करु शकतो. सहकारी बँकांमध्ये जी खाती उघडण्यात आली आहेत, त्यांची कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. 17 आधार कार्ड जिवंत व्यक्तींची आहेत. त्यांची खाती उघडण्यात आली आहेत. पण, त्यापैकी कुणीही हजर झालेला नाही. सिराज आणि मोईन पळून गेले आहेत, असं सोमय्यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world