जाहिरात

काय सांगता ! राज ठाकरेंच्या सभेचं संजय राऊत यांना निमंत्रण, एक जागाही राखीव

राज ठाकरे यांची मुंबईतील विक्रोळीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

काय सांगता ! राज ठाकरेंच्या सभेचं संजय राऊत यांना निमंत्रण, एक जागाही राखीव
मुंबई:

विशाल पाटील, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास आता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडका लावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराची सर्व भिस्त पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंवर आहे. राज यांची मुंबईतील विक्रोळीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

मनसे पक्षाकडूनचं राऊत यांना अधिकृत निमंत्रण देण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिली. त्यांच्यासाठी एक खुर्चीही राखीव ठेवण्यात येणार आहे, असं चव्हाण यांनी सांगितलं. संजय राऊत यांच्या मेंदूला गंज लागलाय ते काहीही बोलतात त्यामुळे राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी या, असा टोला चव्हाण यांनी विचारला. राजकीय विचार कसे असावेत, विचारांची देवाण -घेवाण कशी असावी हे समजण्यासाठी या सभेला या, असं निमंत्रण चव्हाण यांनी दिलं आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

राज यांनी केली होती टीका

राज ठाकरे यांनी यापूर्वी भांडूपमधील सभेत संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. 'संपूर्ण महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करणारा भिकार संपादक इथं राहतो. त्याला वाटतं तोंड त्यालाच आहे. आम्ही ठाकरे आहोत. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत.  शोलेमध्ये डायलॉग होता, तू दोन मारोगे तो हम चार मारेंगे. 

'.... तर हिंदूंच्या जमिनी घेतल्या जातील', योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

( नक्की वाचा : '.... तर हिंदूंच्या जमिनी घेतल्या जातील', योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा )

 कोण बोललं आणि काय बोललं हा माझा प्रश्न  नाही. कोण काय बोलतंय कुणावर बोलतंय किती खालच्या थरावर बोलतंय त्याचं मला देणंघेणं नाही. पण, हे दाखवतात तेव्हा भविष्यातील पिढीला वाटतं हेच राजकारण, हाच समज होत गेला तर महाराष्ट्राचं राजकारण किती घाण होईल याचा विचार केला आहे का?  त्यांना वाटतं आमच्याकडं तोंडं नाहीत. आमचं जर तोंड सुटलं ना तर त्यांना कल्पना आहे या गोष्टींची.. संयम बाळगतो याचा अर्थ XX डू समजू नये, असा इशारा राज यांनी दिला होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com