जाहिरात

'आम्हाला तिघांनाही अपक्ष उभं करा', माजी आमदाराची भाजपाकडे मागणी

बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु आहे.

'आम्हाला तिघांनाही अपक्ष उभं करा', माजी आमदाराची भाजपाकडे मागणी
आष्टी, बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु आहे.  सध्या हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने बाळासाहेब आजबे येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तर महायुतीचा निर्णय होण्याआधीच माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल केलाय. यावर आष्टी मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवू इच्छित असलेले भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी महायुतीकडं एक मागणी केली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

तिकीट कुणालाही देऊ नका. आम्ही तिघंही उमेदवारीसाठी इच्छूक आहोत. तेव्हा तिघांनाही अपक्ष म्हणून उभं करा. जे होईल ते पाहू. माझी ज्यांनी शिफारस केली त्यांनाही मी विनंती करणार आहे. कुणालाच कुणाचा राग नको. आम्ही तिघे महायूतीचेच आहोत. त्यामुळे आम्हाला अपक्ष म्हणून लढू द्यावं. ज्याचं जास्त वजन आहे तो निवडून येईल. या पद्धतीनं जागेचा पेच सोडवावा असं वक्तव्य धस यांनी केलं आहे. धस यांच्या वक्तव्याची सध्या आष्टी मतदारसंघात जोरदार चर्चा सुुरु आहे. 

शरद पवार भाकरी बदलणार?

आष्टीप्रमाणेच बीड विधानसभा मतदारसंघाकडंही सर्वांचं लक्ष लागलंय. बीड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर नाराजीचा सूर दिसून येत असल्याने या मतदारसंघात देखील शरद पवार गटाकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे भानुदास जाधव यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार गटाने उमेदवारी न दिल्यास जरांगे पाटील यांच्या विचारातून ही निवडणूक लढविण्याची तयारी जाधव यांनी केली आहे.

लोकसभेतील मैत्री विधानसभेत तुटली! मुंबईतील जागांवरुन शिंदे-ठाकरे, आमने-सामने

( नक्की वाचा : लोकसभेतील मैत्री विधानसभेत तुटली! मुंबईतील जागांवरुन शिंदे-ठाकरे, आमने-सामने )

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीत बीडचा समावेश नव्हता. त्यामुळे बीडमध्ये शरद पवार कुणाला उमेदवारी देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तीन आमदारांनी पवारांशी अजित पवार गटात प्रवेश केला. फक्त बीडचे आमदार संदीप क्षीरसागर शरद पवारांसोबत राहिले. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
लोकसभेतील मैत्री विधानसभेत तुटली! मुंबईतील जागांवरुन शिंदे-ठाकरे, आमने-सामने
'आम्हाला तिघांनाही अपक्ष उभं करा', माजी आमदाराची भाजपाकडे मागणी
maharashtra-vidhansabha-elections-2024-rahul-gandhi-unhappy-over-seat-sharing-shivsena-ubt
Next Article
मोठी बातमी : निवडणूक समितीच्या बैठकीतून राहुल गांधी बाहेर पडले! 'उबाठा'ला सोडलेल्या जागेवरून नाराज