जाहिरात

Pankaja Munde vs Suresh Dhas : सुरेश धस पंकजा मुंडेंची राष्ट्रीय नेतृत्वाकडे लेखी तक्रार करणार, काय आहे कारण?

Pankaja Munde vs Suresh Dhas : भाजप पक्षश्रेष्टींनी सुरेश धस यांना समज द्यावी अशी विनंती करणार असल्याची पंकजा मुंडे यांनी म्हटल होतं.

Pankaja Munde vs Suresh Dhas : सुरेश धस पंकजा मुंडेंची राष्ट्रीय नेतृत्वाकडे लेखी तक्रार करणार, काय आहे कारण?

बीडमधील सुरेश धस विरुद्ध पंकजा मुंडे असा उघड राजकीय संघर्ष सुरु झाला आहे. भाजपची राष्ट्रीय नेता असतानाही आमदार सुरेश माझ्यावर थेट आरोप करतात, याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करणार आहे. भाजप पक्षश्रेष्टींनी सुरेश धस यांना समज द्यावी अशी विनंती करणार असल्याची पंकजा मुंडे यांनी म्हटल होतं. एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी असं म्हटलं होतं. याचे पडसाद विधिमंडळ परिसरात उमटले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना सगळंच उकरुन काढलं. सुरेध धस यांनी म्हटलं की, "बीडमध्ये माझ्या वाट्याला एकच सीट असल्याचं पंकजा मुंडे वारंवार बोलतात. नमिता मुंदडा आणि सुरेश धस भाजपचे आमदार असतानाही त्या एकच सांगतात. विधानसभेला देखील त्यांची एकच जागा होती. आष्टी मतदारसंघात त्यांचं कमळ चिन्ह नव्हतं, तर त्यांचं शिट्टी हे चिन्ह होते." 

(नक्की वाचा - Pune Traffic : AI द्वारे सुटणार पुण्याच्या वाहतुकीची समस्या, सरकारचा प्लॅन काय?)

"मी कॅमेरे घेऊन जात नाही, कॅमेर पाठी येतात"

सुरेश धस धनंजय मुंडेंची भेट घ्यायला कॅमेरे का घेऊन गेले नाहीत, असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला होता. त्यावर बोलताना सुरेश धस यांनी म्हटलं की, "मी कॅमेरे घेऊन जात नाही, तर कॅमेर माझ्या पाठीमागे येतात. त्यामुळे कुठे जाताना कॅमेरे घेऊन जावं मी ठरवणार नाही. दवाखान्यात असल्यानं मी त्यांना भेटायला गेलो ही बाब खरी आहे." 

संतोष देशमुख हे भाजपचे बुथ प्रमुख होते. म्हणून मी हे प्रकरण तेवत ठेवलं. आरोपींना शिक्षा मिळेपर्यंत मी आवाज उठवत राहणार आहे. संतोष देशमुखांसारखं भयानक प्रकरण घडलं असताना पंकजा मुंडेंनी त्यांच्या कुटुंबियांची साधी भेटही घेतली नाही. त्या प्रकरणाबद्दल काहीही बोलल्या नाहीत. ज्यावेळी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्यावेळी त्या म्हणतात उशीर झाला. शपथच द्यायला नको होती. मात्र धनंजय मुंडे पदावर असताना त्यांनी एकही शब्द का काढला नाही, अशी रोखठोक सवाल सुरेश धस यांनी विचारला.  

(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: सर्वात मोठी बातमी! फरार कृष्णा आंधळेचे लोकेशन सापडले? 3 महिन्यांनी सुगावा लागला)

राष्ट्रीय नेतृ्त्वाकडे लेखी तक्रार करणार- धस

"माजी मंत्री आणि आजी मंत्र्यांच्या मतदारसंघातच गुन्हेगारी बळावलेली आहे. आमच्या मतदारसंघात गुंडगिरी नाही. सगळंकाही परळीत चालतं. त्यांचं दुख हेच आहे आमच्या इथे त्यांच्या विचाराचा माणून निवडून आला नाही. मात्र पंकजा मुंडे यांची तक्रार मी आता राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहे. आतापर्यंत बोललो नाही, आता लेखी तक्रार करणार आहे", असं सुरेश धस यांनी म्हटलं. 

धसांना समज द्यावी, पक्षश्रेष्ठींना विनंती केली 

सुरेश धस माझ्याबद्दल जे बोलत आहेत त्याबद्द्ल पक्षश्रेष्ठींची चर्चा केली आहे. माझा कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाची उल्लेख करणे अपेक्षित नाही. पक्षांच्या भूमिकांना ठेच पोहचून नये म्हणून मागील काही महिने गप्प बसले. मात्र आता मी पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की समज द्यावी, असा पुनरुच्चार पंकजा मुंडे यांनी केला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: