जाहिरात

बंडोबांना कात्रजचा घाट दाखवण्याची योजना तयार? आघाडी-महायुतीने केली भन्नाट आयडिया

महाविकास आघाडी आणि महायुतीतून उमेदवारी मिळाली यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यात अजून कोणाला कोणच्या जागा सुटणार हे ही स्पष्ट झालेले नाही.

बंडोबांना कात्रजचा घाट दाखवण्याची योजना तयार? आघाडी-महायुतीने केली भन्नाट आयडिया
मुंबई:

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक आहे. अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपांचा निर्णय झाला नाही. त्यामुळे इच्छुकांची धाकधुक वाढली आहे. अनेक मतदार संघात इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे आघाडी बरोबरच युतीच्या नेत्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. अशा वेळी बंडखोरांना रोखायचं कसं असा प्रश्न होता. त्यासाठी आता युती आणि आघाडीने नामी शक्कल लढवली आहे. त्यातून बंडखोरी ही होणार नाही अन्  बंडखोरांना कात्रजचा घाटही दाखवता येईल. पण त्यात आता किती यश मिळणार हे मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी समजेल. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाविकास आघाडी आणि महायुतीतून उमेदवारी मिळाली यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यात अजून कोणाला कोणच्या जागा सुटणार हे ही स्पष्ट झालेले नाही. अशा वेळी इच्छुक मात्र उमेदवारी मिळावी म्हणून देव पाण्यात ठेवून आहेत. तर इच्छुकांची मोठी संख्या पाहात बंडखोरी कशी टाळायची यासाठी आघाडी आणि महायुतीने रणनिती आखली आहे. त्यानुसार शेवटच्या क्षणी उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. शिवाय ज्या जागांवर वाद आहेत अशा जागांवर उमेदवारांना परस्पर एबी फॉर्म दिले जातील. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळाली आहे हे समजणार नाही. शेवटच्या क्षणी बंडखोरी करणाऱ्यांना धावपळ करावी लागेल. 

ट्रेंडिंग बातमी - महायुती सरकारला दणका! निवडणूक आयोगाने 'ते' निर्णय केले रद्द, महामंडळाच्या नियुक्त्यांवरही गाज

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने आपली यादी सामनातून जाहीर होईल असे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेतील इच्छुक हे सामनाकडे लक्ष लावून असतील. काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटानेही ज्या जागांवर वाद नाही, जे उमेदवार सक्षण आहेत अशा जागांवरील उमेदवारी सर्वात पहिले जाहीर केली जाणार आहे. पण ज्या ठिकाणी इच्छुकांची संख्या अधिक आहे अशा जागांवर एबी फॉर्म अधिकृत उमेदवाराला शेवटच्या क्षणी दिला जाणार आहे. जिल्हाध्यक्षांच्या मार्फत तो उमेदवाराला दिला जाईल. जागांवरून वाद होऊ नये. त्यातून बंडखोरी कमी व्हावी यासाठी सर्वच पक्षांनी हा निर्णय घेतला आहे. अशा स्थिती बंडखोरांना बेसावध ठेवण्याची रणनिती या मागे आहे.  

ट्रेंडिंग बातमी - मविआत फूट? 'ते' दोन पक्ष बाहेर पडणार? एकाने उमेदवार जाहीर केला तर दुसऱ्याने थेट...

दरम्यान महायुतीची पहिली यादी आज शनिवारी घोषित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीत याबाबत रात्री उशिरा पर्यंत बैठक झाली. अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात ही बैठक झाली. त्यात  अंतिम तोडगा निघाला नाही. मात्र जवळपास 243 जागांवर एकमत झाले आहे. उरलेल्या जागांवर तोडगा काढला जाईल. त्या आधी मुख्यमंत्री गुवाहाटीला जाणार आहेत. फडणवीस नागपूर दौऱ्यावर आहेत. तर अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानंतर उललेल्या जागांवर निर्णय घेतला जाणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - अजित पवारांनी विरोधकांना हात जोडले, थेट बोलले, पण का?

महायुती प्रमाणे महाविकास आघाडीत ही अजून जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळे सुरूच आहे. काँग्रेस आणि शिवसेनेत तर जागांवरून टोकाची भूमीका घेतली गेली आहे. त्यामुळे दिल्लीतल्या नेत्यांना मध्यस्थी करण्याची वेळ आली आहे. तर तुटेपर्यंत ताणू नका असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. असे असले तरी मविआमध्ये 250 जागांवर सहमती झाल्याचे समजत आहे. उरलेल्या जागांवर एक दोन दिवसात तोडगा काढा अशा सुचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत. त्यामुळे जागा वाटप झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा टप्प्याटप्प्याने केली जाईल.  

Previous Article
अजित पवारांनी विरोधकांना हात जोडले, थेट बोलले, पण का?
बंडोबांना कात्रजचा घाट दाखवण्याची योजना तयार? आघाडी-महायुतीने केली भन्नाट आयडिया
dharavi-redevelopment-ashish-shelar-challenges-aaditya-thackeray
Next Article
मर्दांचा पक्ष असाल तर आव्हान स्वीकारा! आशिष शेलारांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज