जाहिरात

Election 2026 : मार्करची खूण पुसल्यास पुन्हा मतदान करता येतं? निवडणूक आयोगाने दिली महत्त्वाची माहिती

मतदानानंतर बोटावरील शाई Nail polish remover ने सहज निघत असल्याचं समोर आलं आहे. अनेक मतदारांनी याचे व्हिडिओ करुन आपल्या सोशल मीडियावर टाकले आणि चिंता व्यक्त केली आहे.

Election 2026 : मार्करची खूण पुसल्यास पुन्हा मतदान करता येतं? निवडणूक आयोगाने दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Municipal Corporation Election 2026 : राज्यात आज १५ जानेवारी रोजी २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान केलं जात आहे. मतदानादरम्यान अनेक केंद्रांवरुन तक्रारी समोर येत आहेत. मतदानानंतर बोटावरील शाई Nail polish remover ने सहज निघत असल्याचं समोर आलं आहे. अनेक मतदारांनी याचे व्हिडिओ करुन आपल्या सोशल मीडियावर टाकले आणि चिंता व्यक्त केली आहे. इतकच काय तर मंत्री संजय शिरसाट यांनी बोगस मतदानाची भीती व्यक्त केली आहे. बोटावरील शाई सहज निघत असेल तर मोठ्या संख्येने बोगस मतदान होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान निवडणूक आयोगाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 

निवडणूक आयोगाने सांगितलं, बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरील शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचं आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे. 

Municipal Corporation Election 2026 Fact Check: मार्करने बोटाला लावलेली शाई पुसली जाते? बोगस मतदानाची मंत्र्यानेच वर्तवली भीती

नक्की वाचा - Municipal Corporation Election 2026 Fact Check: मार्करने बोटाला लावलेली शाई पुसली जाते? बोगस मतदानाची मंत्र्यानेच वर्तवली भीती

केवळ बोटावरील शाई पुसली म्हणून त्या व्यक्तीला पुन्हा मतदान करता येत नाही...

बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ बोटावरील शाई पुसली म्हणून त्या व्यक्तीला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत. 

मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी. तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com