Maharashtra Exit Polls : सर्व देशाचं लक्ष लागलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार पाडली आहे. विधानसभा निवडणुका संपताच एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये भाजपाच्या नेतृत्त्वाखालील महायुती विजयी होईल, असं भाकित करण्यात आलं आहे. निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. पण, एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या महायुतीच्या विजयाचा अर्थ काय? भाजपा मतदारांचा 'लाडका' पक्ष का बनतोय? हे समजून घेणं आवश्यक आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण, एक्झिट पोलमध्ये त्याच्या उलट चित्र दिसलंय. NDTV इंडियावर बोलताना वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक नीरजा चौधरी यांनी दोन कारणं सांगितली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहिलं कारण : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दलची सहानभूती लाट ओसरली?
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सहानुभूतीची लाट दिसली होती. दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यानं त्यांना फायदा मिळाला होता. बारामती लोकसभा निवडणुकीचा निकाल हे याचं मोठं उदाहारण आहे. लोकसभा निवडणुकीत दिसलेली सहानुभूतीची लाट आता ओसरली आहे, असं मत चौधरी यांनी व्यक्त केला. साधरणत: एकाच निवडणुकीत या प्रकारची लाट जाणवते. महाराष्ट्रातही तसंच घडत आहे.
( नक्की वाचा : Maharashtra Exit Polls 2024 : महाराष्ट्रात कुणाचं सरकार? पाहा काय सांगतात एक्झिट पोल )
दुसरं कारण : लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली?
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या सरकारनं सुरु केलेल्या लाडक्या बहीण योजनेचा भाजपा आघाडीला फायदा झालाय, असं एक्झिट पोलमधून दिसत आहे. ही योजना भाजपासाठी गेमचेंजर ठरलीय. नीरजा चौधरी यांनी देखील हे मान्य केलंय. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा कल महायुतीच्या बाजूनं झुकला, असं त्यांनी सांगितलं. या योजनेवर खुश होईन महिलांना भाजपाला मतदान केलं, असं त्यांनी सांगितलं.
नीरजा चौधरी यांनी निवडणुकाच्या काळात मराठवाडा आणि विदर्भात दौरा केला होता. त्या दौऱ्यातील अनुभव त्यांनी सांगितला. चौधरी यांनी त्या दौऱ्यात वेगवेगळ्या गटातील महिलांशी चर्चा केली होती. या योजनेचा फायदा मिळाला नाही, असं सांगणारी एकही महिला आपल्याला आढळली नाही, असं चौधरी यांनी सांगितलं. दलित महिला देखील या योजनेमुळे सरकारवर खुश होत्या असं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : भाजपाला पाठिंबा दिला म्हणून दलित तरुणीची हत्या, मतदानाच्या दिवशी धक्कादायक घटना )
निवडणूक प्रचारसभेतही भाजपानं या योजनेचा जोरदार प्रचार केला होता. महाविकास आघाडीचा ही योजना बंद करण्याचा डाव आहे, असा आरोप केला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world