विधानसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडत आहे. तर आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी ही झडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सध्या सभांचा धडाका लावला आहे. अमित शाह प्रत्येक सभेत कश्मीरमधील कलम 370 बद्दल वक्तव्य करत आहेत. राहुल गांधी यांची चौथी पिढी जरी आली तरी कलम 370 पुन्हा लागू करणार नाही असं अमित शाह म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी इंदीरा गांधी जरी खाली आल्या तरी कलम 370 लागू करणार नाही असं ठणकावून सांगितलं होतं. त्याला आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमित शाह प्रत्येक सभेत कलम 370 बाबत वक्तव्य करत आहेत. कलम 370 कश्मीर मधून हटवणार हे भाजपने वचन दिले होते. ते वचन भाजपने पूर्ण केलं. कलम 370 हटवल्यानंतर कश्मीर खऱ्या अर्थाने भारताचा भाग झाला आहे. भारताचे संविधान आता कश्मीरमध्ये लागू झाले आहे. या आधी कश्मीरमध्ये वेगळ झेंडा, वेगळं संविधान होतं. भारतात असूनही कलम 370 मुळे कश्मीर भारतापासून वेगळा होता. पण 370 हटवल्यामुळे इतर राज्या प्रमाणे कश्मीरही भारताचाच भाग बनला आहे. हे कलम पुन्हा लागू करावं म्हणून काँग्रेसने कश्मीर विधानसभेत ठराव मंजूर केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'उभं करायला अक्कल लागते, उद्ध्वस्त करायला नाही' विखेंच्या गडात पवारांची फटकेबाजी
पण असे कितीही ठराव मंजूर केले तरी कश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू केलं जाणार नाही असे अमित शाह सांगत आहे. शिवाय राहुल गांधींची चौथी पिढी आली तरी हे 370 कलम लागू करणार नाही. शाह येवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनीइंदिरा गांधी जरी खाली आल्या तरी 370 कलम लागू होणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे. शाह यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतला आहे.
ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री येती घरी, खड्डे भरणीचा मुहूर्त ठरी!; अंबरनाथकरांमध्ये रंगली चर्चा
अमित शाह यांच्या या वक्तव्या बाबत खरगे यांना विचारले असता त्यांनी अमित शाह हे इंदिरा गांधी समोर बच्चा आहेत असं म्हटलं. शिवाय त्यांच्या या वक्तव्याला जास्त महत्व देत नाही असं ही त्यांनी सांगितलं. खरगे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लातूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी याबाबत विचारले. शाह यांच्या बाबतच्या प्रश्नाला त्यांनी एका वाक्यत उत्तर देत अधिक बोलणं टाळलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world