लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने पाडण्याची भूमीका घेतली होती. त्याचा थेट फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला होता. त्याची सर्वाधिक झळ ही मराठवाड्यात बसली होती. आता विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत समाजाने उमेदवार रिंगणात उतरवायचे की पुन्हा पाडण्याची भूमीका घ्यायची याबाबत निर्णय होणार आहे. मराठा समाजाकडून निवडणूक लढण्यासाठी जवळपास 800 जण इच्छुक आहेत. त्यांनी तसे अर्ज मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केले आहेत. या 800 जणांना बैठकीसाठी अंतरवाली सराटी इथे बोलवण्यात आले आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची दाट शक्यत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणुकीत पडण्याच्या भूमिकेत असलेला मराठा सामाज विधानसभा निवडणुकीत मात्र लढण्याच्या भूमिकेत असल्याच चित्र आहे. तसे संकेत मनोज जरांगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिले होते. त्यासाठी जरांगे यांनी आचारसंहिता लागताच विधानसभेच्या 288 जागांसाठी राज्यातील विविध मतदार संघातून प्रस्ताव दाखल करणाऱ्या इच्छुकांची तातडीने आज गुरूवारी अंतरवालीत बैठक बोलावली आहे. राज्यातील 288 जागेसाठी अंतरवालीत 800 पेक्षा जास्त इच्छुक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
त्यामुळे महायुती बरोबरच महाविकास आघाडीची डोके दुखी वाढण्याची शक्यता आहे. या बैठकीत जरांगे पाटील इच्छुक उमेदवारां बरोबर चर्चा करणार आहेत. शिवाय मतदार संघाची स्थिती काय आहे याचा आढावा घेणार आहेत. त्याच बरोबर तिथली जाती निहाय प्रत्येक मतदार संघातील परिस्थिती,मतदार संघातील समस्या,सामाजिक सांस्कृतिक प्रश्न,शेतकरी,उद्योग प्रश्न या बाबद चर्चा करणार आहे. त्यानंतर काही मतदार संघ शॉर्टलीस्ट केले जाणार आहेत.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीला धक्का, एक पक्ष पडला बाहेर
प्रत्यक्ष निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय 20 ऑक्टोबरच्या समाजाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. त्या आधी ही सर्व तयारी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे काय निर्णय घेतात यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. लोकसभेला जरांगे यांनी थेट पाडण्याची भूमीका घेतली होती. त्याचा सर्वाधिक फटका हा भाजपला बसला होता. शिवाय भाजपचे उमेदवार पाडा असे विधान ही जरांगे यांनी केले होते. शिवाय मोदी शाह यांचे गणित बघिडवणार असेही वक्तव्य जरांगे यांनी या आधी केले होते. त्यामुळे मराठा समाजाची पुढची भूमीका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world