जाहिरात

Nashik Nagar Parishad Election Results 2025 : नाशिकमधील 6 नगरपरिषदांमध्ये कांटे की टक्कर; कोण मारणार बाजी?

पुढील काही तासात राज्यातील नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात होईल.

Nashik Nagar Parishad Election Results 2025 : नाशिकमधील 6 नगरपरिषदांमध्ये कांटे की टक्कर; कोण मारणार बाजी?

Nashik Local Body Poll Results 2025 : पुढील काही तासात नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात येईल. महानगरपालिकेच्या तोंडावर हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 11 नगरपरिषदांसाठी आज मतमोजणी होणार असून यातील खास करून 6 नगरपरिषदांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

6 नगरपरिषदांकडे सर्वांचे लक्ष

सिन्नर - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा बालेकिल्ला आणि ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी सिन्नर नगरपरिषद प्रतिष्ठेचा विषय बनली असून इथे चौरंगी लढत बघायला मिळाली होती.

येवला - भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यामध्ये भुजबळ रुग्णालयात उपचार घेत असल्याने समीर भुजबळांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती. दरम्यान भुजबळ यांना पराभूत करण्यासाठी इथे चक्क शिंदे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली होती. 

त्र्यंबकेश्वर - त्र्यंबकेश्वर नगरपरिषद ही कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा नारळही त्र्यंबकेश्वरमध्ये फोडला होता. विशेष म्हणजे शर्थीचे प्रयत्न करूनही इथे महायुती एकत्र आली नव्हती. कुंभमेळ्याचं आयोजन करण्याची जबाबदारी घेतलेले मंत्री गिरीश महाजन इथे तळ ठोकून होते. 

Maharashtra Local Body Election Results 2025 Live  नगरपरिषद निवडणुकांमध्ये कुणाची होणार सरशी? वाचा सर्व अपडेट

नक्की वाचा - Maharashtra Local Body Election Results 2025 Live नगरपरिषद निवडणुकांमध्ये कुणाची होणार सरशी? वाचा सर्व अपडेट

भगूर - स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मस्थान असलेली ही नगरी गेल्या तीन दशकापासून ठाकरे शिवसेनेच्या ताब्यात होती. त्यानंतर पहिल्यांदाच शिंदे शिवसेनेची निवडणूक होत आहे. शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर या निवडणूक लढवत आहे. त्यांना अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या प्रेरणा बलकवडे यांनी सर्व पक्षांचे मोट उभारता काटेकी टक्कर दिली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही इथे सभा घेऊन निवडणूक रंगतदार बनवली होती. 

इगतपुरी - ठाकरे गटाचा गड म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीमध्ये सर्वच प्रमुख उमेदवारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने ठाकरेंसाठी हा मोठा धक्का होता. यासोबतच अजित पवार आणि शिंदे गट ही इथे भाजप विरोधात मैदानात होता. 

मनमाड - मनमाड नगरपरिषद निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या समीर भुजबळ आणि सुहास कांदे या दोघांनी निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com