विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले असले तरी परळी विधानसभा मतदार संघातील वाद शमण्याचे नाव घेत नाही. परळी मतदारसंघात मतदानादरम्यान अनेक गैरप्रकार झाले आहेत असा आरोप होत आहे. मतदार संघातील 122 केंद्रावर बोगस मतदान झाले आहे. या ठिकाणी एकच व्यक्ती मतदान करत होता. याबाबतच्या तक्रारी आम्ही प्रशासनाकडे केल्या आहे. पण कोणत्याही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे या सर्व मतदान केंद्रावर फेर मतदान घ्यावे अशी मागणी राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. देशमुख हे परळी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ईव्हीएम मशीन फोडण्याची जी घटना घडली ती आमच्या कार्यकर्त्यांनी केली नाही. ते परळीतील गुंडांनी केली आहे असा आरोपही त्यांनी केलाय. विरोधकांनी बोगस मतदान केले आहे. मात्र खोटे गुन्हे दाखल करून पोलीस आमच्या मागे लावले असा गंभीर आरोप ही राजेसाहेब देशमुख यांनी केलाय. ईव्हीएम फोडण्याच्या गुन्ह्यात अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही सर्व मुले अगदी मतदान केंद्राच्या परिसरातच काय त्या गावात सुद्धा गेले नव्हते. तरीदेखील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. आम्ही याबाबत वरिष्ठांकडे दाद मागणार आहोत असं ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - सट्टाबाजारात आघाडी की महायुती? एक्झिट पोलनंतर सट्टाबाजाराचा अंदाज काय?
तर धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप ॲड माधव जाधव यांनी केली आहे. परळी विधानसभा मतदार संघात 122 मतदान केंद्र ही संवेदनशील आहेत. त्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवावा यासाठी न्यायालयात याचिका केली होती. याचा रागा धरून आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे स्पीड पोस्टने तक्रार पाठवली आहे. मात्र अजून ही गुन्हा दाखल केला गेला नाही असं ही ते म्हणाले. ॲड.माधव जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत.
परळी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे हे मैदानात उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांमध्ये या मतदार संघात चुरशीची लढत होत आहे. मतदाना दरम्यान या मतदार संघात अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. मुंडे आणि देशमुख यांचे समर्थक एकमेकांना भिडले होते. एका ठिकाणी तर ईव्हीएमही फोडण्यात आले. आता मतदान झाल्यानंतर काही केंद्रावर फेर मतदानाची मागणी करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world