जाहिरात
Story ProgressBack

विजय शिवतारेंचा सुनेत्रा पवारांना शब्द, मताधिक्य किती देणार तेच सांगितलं

Read Time: 2 min
विजय शिवतारेंचा सुनेत्रा पवारांना शब्द, मताधिक्य किती देणार तेच सांगितलं
सासवड:

विजय शिवतारे यांनी काही झालं तरी बारामती लोकसभेतून निवडणूक लढवणारच अशी घोषणा केली होती. मात्र मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर शिवतारे यांनी आपली तलवार म्यान केली आहे. यापार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी शिवतारे यांची त्यांच्या सासवड इथल्या निवासस्थानी भेट घेतली. याभेटीत दोघांमध्ये राजकीय चर्चाही झाली. शिवाय शिवतारेंनी सुनेत्रा पवार यांना शब्द दिला असून पुरंदर तालुक्यातून किती मताधिक्य देणार हेही सांगून टाकलं आहे. 

  
पवार-शिवतारे भेटीत काय घडलं? 
सुनेत्रा पवार या सध्या संपुर्ण मतदार संघ पिंजून काढत आहेत. त्या पुरंदरच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेना नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या घरी सदिच्छ भेट दिली. शिवतारे यांच्या सासवड येथील निवासस्थानी झालेल्या भेटीत सुनेत्रा पवार यांनी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी विजय शिवतारे यांनी आम्ही सर्वजण मनापासून सक्रिय झालो असून कार्यकर्तेही विविध गावात प्रचार करत आहेत. त्यामुळे पुरंदर तालुक्यातून ५० हजारपेक्षा अधिक मताधिक्य मिळेल असा शब्द  शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांना दिला आहे. यावेळी शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - सुनेत्रा पवारांसाठी मोदी आणि भाजपचा मोठा प्लॅन

शिवतारेंनी केला होता विरोध 
बारामती लोकसभेतून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला विजय शिवतारे यांनी विरोध केला होता. शिवाय पवारां विरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला होता. यावेळी त्यांनी अजित पवारांवर सडकून टिकाही केली होती. शेवटपर्यंत ते आपल्या उमेदवारीवर ठाम होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केल्यानंतर शिवतारे यांनी आपली तलवार म्यान केली. कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बायको आहे म्हणून यांना मतं द्या ही तर लोकशाहीची थट्टा आहे अशी टिका शिवतारे यांनी केली होती. बारामतीम्हणजे पवारांना आंदण दिलेलं नाही असंही ते बोलले होते. 

हेही वाचा - खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा अन् फडणवीसांची बोलकी प्रतिक्रीया, सस्पेन्स वाढला

आधी विरोध आता त्यांचाच प्रचार  
विजय शिवतारे यांनी आधी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र आता त्यांना त्याच सुनेत्रा पवारांचा प्रचार करावा लागणार आहे. त्यांचे कार्यकर्ते प्रचाराला लागल्याचंही त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या बरोबर झालेल्या भेटीत सांगितलं. आता पर्यंत दुष्मनी पाहिली आता मैत्री कशी आहे ते पाहा, असंही त्यांनी सुनेत्रा पवारांना सांगितलं. शिवाय पुरंदर तालुक्यातून ५० हजाराचं मताधिक्य देण्याचा शब्दही त्यांनी दिला. त्यासाठी कार्यकर्ते मेहनत करतील असंही ते म्हणाले. त्यामुळे ज्यांना विरोध केला त्यांचाच प्रचार करण्याची वेळ शिवतारेंवर आली आहे.  
 

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination