Election Results 2026: राज्यातील नगरपालिका तसेच महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. नवी मुंबई, उल्हासनगर, मिरा भाईंदर, वसई-विरार यासह काही महानगरपालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना भोपळाही फोडताही आलेला नाही. महानगरपालिका निवडणुकीमध्ये ओबीसी फॅक्टर पवारांना नडल्याचा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय. ओबीसी समाजातील प्रभावी नेतृत्व निवडणूक प्रचारात सक्रिय न दिसल्याने पक्षाच्या कामगिरीवर परिणाम झाला. विशेषतः छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात न दिसल्याचा फटका बसल्याचंही लक्ष्मण हाके यांचे म्हणणंय. परिणामी काही महापालिकांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याचे चित्र दिसले. लक्ष्मण हाके यांनी नेमकी काय टीका केलीय, जाणून घेऊया सविस्तर...
ओबीसींना तुम्ही वेड्यात काढायचं महापाप करत असाल तर....: लक्ष्मण हाके | Laxman Hake Reaction On OBC | Laxman Hake Reaction On Muncipal Corporation Election 2026
ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, दादांची (अजित पवार) राष्ट्रवादी आता फक्त काही लोकांची राहिलीय. हिच राष्ट्रवादी छगन भुजबळ यांच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे गेले, त्यांची माती झालीय. धनंजय मुंडे असतील किंवा आणखी कोणी ओबीसीचे चेहरे असतील ओबीसीची माणसंच रणांगणात नव्हती, आता तुम्हाला कळलं असेल तुम्ही ज्या गोष्टींचा उदो उदो केला, अरे आम्ही ओरडून सांगतोय 60 टक्के ओबीसी आहोत. 60 टक्के ओबीसींना तुम्ही वेड्यात काढायचं महापाप करत असाल तर भोपाळाच हाती येणार आहे ना. तुतारी नावाच्या पक्षाला 22 नगरपालिकांमध्ये भोपळा फोडता आलेला नाही, हे कशाचं द्योतक आहे? भुजबळसाहेब असते,ओबीसी चेहरा असता सर्वसमावेशक भूमिका तुम्ही घेतल्या असत्या. आरक्षण आमचं जातंय, आमच्या बाजूने बोला, तुम्ही पुरोगामी आहात.
संपूर्ण राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 167 नगरसेवक निवडून आले आहेत. कोणत्या महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे किती नगरसेवक निवडून आले आहे ते पाहा
पिंपरी-चिंचवड - 37
पुणे - 27
अहिल्यानगर - 27
सांगली-मिरज-कुपवाड - 16
परभणी - 11
अमरावती - 11
कल्याण-डोंबिवली - 9
धुळे - 8
नाशिक - 4
कोल्हापूर - 4
मुंबई - 3
पनवेल - 2
जळगाव, सोलापूर, लातूर, अकोला,नागपूर,चंद्रपूर येथे प्रत्येकी 1 नगरसेवक आहे.
(नक्की वाचा: Maharashtra Politics: पुढील 28 तासात राजकीय भूकंप? 40 जणांचे नगरसेवकपद जाणार? भाजपचे टेन्शन वाढले)
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत फारच सुमार दर्जाची ठरली असून या पक्षाचे संपूर्ण राज्यात फक्त 35 नगरसेवक निवडून आले आहेत.
Laxman Hake on OBC Leaders | ओबीसींना दूर ठेवाल तर निवडणुकीत भोपळा येईल - लक्ष्मण हाके । NDTV मराठी