मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. कोणत्या मतदार संघात उमेदवार असतील हे ते जाहीर करणार आहेत. यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे यांनी तुतारीची सुपारी घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते ठरवून महाविकास आघाडीचं काम करत आहेत.त्यांनी लोकसभेलाही तेच केले. बारामतीच्या आदेशावर जरांगे यांचे काम सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनोज जरांगे हे तकलादू उमेदवार देतील. त्यांना त्यांची औकात लवकर समजेल अशा शब्दात हाके यांनी जरांगे यांच्यावर टिका केली आहे. एक मराठा लाख मराठा म्हणून निवडणूका जिंकता येत नसतात. दलित आणि मुस्लिम जरांगे यांना कधीही साथ देणार नाहीत. जरांगे यांनी 135 आमदार पाडणार असं सांगितलं होतं. त्याचं काय झालं. पवारांच्या आदेशावर ते काम करत आहेत असा आरोपही हाके यांनी केला. मनोज जरांगे तुतारीची सुपारी का सुपारी घेऊन ते तुतारी वाजवणार आहेत? हे लवकरच समजेल असे ते म्हणाले. जरांगे हे पुर्णपणे बारामतीला मॅनेज झाले आहेत असेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - पालघरमध्ये चाललंय काय? एका मागोमाग नेते का होत आहेत गायब?
जरांगे पाटील यांना अनेक उमेदवार रात्रीत येवून भेटले आहेत. त्यांच्या विरोधात जरांगे उमेदवार देणार नाहीत. त्यांच्याकडे फक्त पाच ते दहा उमेदवारांची यादी आहे. जरांगे हे आता स्वताच्या जाळ्यात फसले आहेत. निवडणूक लढणे आणि ती जिंकणे यासाठी कुवत लागते. ती जरांगे यांच्याकडे नाहीत. ते सुपारी घेवून महाविकास आघाडीचे काम करत आहेत. त्यांनी लोकसभेला ही तेच केलं, असा आरोप हाके यांनी केला आहे.जरांगे हे सध्या दमबाजी करत आहेत. एका जातीच्या जोरावर धमकी देवून चालत नाही असेही ते म्हणाले. जरांगे जे भाषा सध्या वापरत आहेत ती योग्य नाही अशी भाषा वापरून चालत नाही असेही त्यांनी सांगितले.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे आणि हिताचे रक्षण जो करेल त्या मागे ओबीसी समाज उभा राहील असेही हाके म्हणाले. त्यामुळे आम्ही शंभर पेक्षा जास्त लोकांची यादी तयार करणार आहोत. तिथे कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाला पाडायचं हे ठरवणार आहोत. त्यानंतर जरांगे नावाचं वटवागूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलं आहे ते इतिहास जमा होईल असा दावाही हाके यांनी या निमित्ताने केला आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world