बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विकासात भर घालण्यासाठी, तसेच मतदारसंघाचा डबल विकास करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना संसदेत पाठवा असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान नुकतेच पार पडले. त्यानंतर महादेव जानकर हे थेट बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात उतरले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )
परभणीवरून येताना त्यांनी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर या ठिकाणी जाऊन शंभू महादेव अभिषेक घातला. त्यानंतर इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरात जुन्या सवंगड्यांसह पोहण्याचा व रानमेवा खाण्याचा आनंद घेतला. त्यानंतर ते महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात उतरले.
हेही वाचा - आधी पवारांचा झटका, आता फडणवीसांचा धक्का, माढ्यात 'पिक्चर अभी बाकी है'
बारामतीसारखाच संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना खंबीरपणे साथ द्या असे आवाहन महादेव जानकर यांनी यावेळी केले. देशातील महत्वपूर्ण लढत म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. त्यामुळे मतदान करताना आपल्या मतदारसंघाची प्रगती करण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असेही जानकर यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world