Pune News: 'लाडक्या बहि‍णींना 14 तारखेला 3 हजार मिळणार!', पुण्यात मेसेज व्हायरल; निवडणूक आयोगाने काय म्हटलं? 

पुण्यात व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये काय म्हटलंय, अशा प्रकारचे मेसेज राज्यभरात व्हायरल होत असल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Municipal Corporation Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांकडून वचननामा, जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये मतदारांसाठी मोठ-मोठ्या घोषणा देण्यात आल्या. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षांकडून विविध कल्पना लढवल्या जात आहेत. दरम्यान पुण्यात एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसने याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर निव

१४ जानेवारीला बँक खात्यात ३ हजार जमा होणार...

लाडकी बहीण योजनेंतर्गत दोन महिन्यांचे पैसे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला बँक खात्यात जमा केले जाणार असल्याच्या काँग्रेसच्या दाव्याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना सोमवारी सकाळी ११:०० पर्यंत याबाबतची वस्तुस्थिती काय ते स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. संदेश कोंडविलकर यांनी आयोगाला शनिवारी एक पत्र देऊन दावा केला होता की, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ असे २ महिन्यांचे ३ हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात राज्य सरकार १४ जानेवारीला म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी जमा करणार आहे. असे मेसेज मतदारांना येत आहेत. हा आचारसंहितेचा भंग आहे. महिलांना हे एकप्रकारे मतदानासाठीचे प्रलोभन आहे, तेव्हा आयोगाने सरकारला तसे करण्यापासून रोखावे. अखेर आयोगानेही याची दखल घेत वस्तूतिथी तपासण्याचे आदेश दिले आहे. 

नक्की वाचा - Vinod Tawade : 'युद्धात आणि प्रेमात सर्व माफ असतं'; अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर विनोद तावडेंचं मोठं वक्तव्य

Advertisement

व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय?

व्हायरल मेसेजमध्ये दिल्यानुसार - मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या लाडक्या बहि‍णींना मिळणार मकर संक्रांतीची थेट भेट. ३००० हजार रुपये होणार खात्यात जमा. म्हणून आपण सगळ्यांनी प्रभाग क्र. ४० मधील लाडक्या बहि‍णींना कमळासमोरील बटण दाबून प्रचंड मताने निवडून द्या. वरील मेसेज हा पुण्यातील प्रभाग ४० कोंडव्यातील आहे. या मेसेजमध्ये त्या प्रभागातील सर्व उमेदवारांची नावं ही देण्यात आली आहेत. राज्यभरातील प्रभागांमध्ये अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत असल्याचं सांगितलं जात आहे. 

Topics mentioned in this article