
लोकसभा निवडणूक आटोपताच राज्यातील सर्व पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षांमध्ये इच्छूक उमेदवारांमध्ये मोर्चेबांधणी सुरु आहे. विद्यमान आमदारांसोबत प्रशासनात काम केलेले अधिकारी तसंच मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी (PA) देखील निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे.
राज्यातील मंत्री, आमदार, राजकीय नेते यांची विधानसभा निवडणूकी लढण्याची तयारी नवी नाही. पण आता काही मंत्र्याचे स्विय सहायक आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांनी विधानसभा स्वप्न पाहत आहेत. त्यांना विधीमंडळ इमारत खुणावत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण इच्छूक ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे खासगी सचिव राहिलेले बालाजी खतगावकर नांदेड जिल्ह्यात मुखेड विधानसभा येथून निवडणूक यासाठी इच्छुक आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचे ओएसडी राहिलेल सुमित वानखेडे वर्धा जिल्हयात आर्वी येथून इच्छुक आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना (2014-2019) त्यांचे स्वीय सचिव राहिलेले अभिमन्य पवार यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. ते सध्या लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघाचे आमदार आहेत. वानखेडे देखील अभिमन्यू पवार यांचं अनुकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत.
( नक्की वाचा : मोठी बातमी : 'अमित शहांनी शब्द पाळला नाही', शिवसेना नेत्याची नाराजी उघड )
भाजपा आमदार महेश लांडगे यांचे पीए सोमेश वैद्य सोलापूर दक्षिण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. भाजपाचेच सुभाष देशमुख सध्या या मतदासंघाचे आमदार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world