Pune News: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अनुषांगाने पुणे शहरामध्ये 14 जानेवारी 2026 रोजी मतपेटी वाटप, 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका हद्दीत विविध क्षेत्रिय कार्यालय, शाळा, महाविद्यालय येथे संभाव्य होणारी गर्दी तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागांतर्गत विविध रस्त्यावर वाहतूक कोंडी होवू नये. तसेच वाहतूक सुरळीत तसेच सुरक्षित राहण्यासाठी 14 जानेवारीपासून ते 16 जानेवारीपर्यंत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. कोणत्या विभागात वाहतूक वळवण्यात आलीय तसेच वाहतुकीचे मार्ग बंद असणार आहेत, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
1. विमानतळ वाहतूक विभाग
वाहतुकीस बंद असणारे मार्ग:
फिनिक्स मॉल मागील रस्ता - मारुती शोरुम जवळून सुरू होणारा ते सॉलीटीअर बिल्डिंग निको गार्डनपर्यंतचा रस्ता वाहतुकीस बंद राहील
पर्यायी मार्ग:
विमाननगर चौकातुन श्रीकृष्ण हॉटेल चौकतून इच्छित स्थळी जावे.
दत्तमंदिर चौकातून सरळ नगर रोड डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे.
2. विश्रामबाग वाहतूक विभाग
वाहतुकीस बंद असणारे मार्ग:
पुरम चौकाकडून टिळक चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील
अलका टॉकिज चौकातून टिळक रोडने पुरम चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील
न्यु इंग्लिश स्कुलकडून विसावा मारूती चौकाकडे जाणारा रस्ता
पर्यायी मार्ग:
पुरम चौकातून सरळ बाजीराव रोडने इच्छित स्थळी जावे.
अलका टॉकिज चौकातून सरळ शास्त्री रोडने सेनादत्त चौक-दांडेकर पुल मार्गे इच्छित स्थळी जावे.
न्यु इंग्लिश स्कुल अलका टॉकिज चौक मार्गे इच्छित स्थळी जावे
(नक्की वाचा: Pune Municipal Corporation Election 2026: लाडक्या बहिणींना चांदीच्या जोडव्यांचे प्रलोभन, भावांसाठी आणलेली 1 कोटींची दारू जप्त)
3. दत्तवाडा वाहतूक विभाग
वाहतुकीस बंद असणारे मार्ग:
बाजीराव रोडने सणस पुतळा येथुन ना.सी. फडके चौकाकडे जाणारा मार्ग
ना.सी. फडके चौकाकडुन सणस पुतळा चौकाकडे जाणारा मार्ग
सारसबाग खाऊ गल्ली येथुन थोरले माधवराव पेशवे रोड कडे जाणारा मार्ग
पर्यायी मार्ग:
बाजीराव रोडने सरळ ए.बी.सी चौक मार्गे किंवा पुरम चौकातून जेधे चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
निलायम ब्रिज बाजूने सावरकर चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
बाजीराव रोडने सरळ ए.बी.सी चौक मार्गे किंवा पुरम चौकातून जेधे चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
4. हडपसर वाहतूक विभाग
वाहतुकीस बंद असणारे मार्ग:
शिवसेना चौक ते सानेगुरुजी पर्यंतचा पुर्ण मार्ग बंद करण्यात येत आहे
पर्यायी मार्ग:
-हडपसर वेस शिवसेना चौक अमरधाम स्मशान भुमी माळवाडी डीपी रोड मार्गे
- हडपसर गाडीतळ संजीवनी हॉस्पीटल डीपी रोडने सिध्देश्वर हॉटेल मार्गे
5. समर्थ वाहतूक विभाग
वाहतुकीस बंद असणारे मार्ग:
पावर हाऊस चौक ते बॅनर्जी चौक
संत कबीर चौक ते क्वाटरगेट चौक
ए डी कॅम्प चौक ते जुना मोटार स्टँड पर्यंत
रोमोशी गेट ते जुना मोटार स्टँड
पर्यायी मार्ग:
शांताई हॉटेल - क्वाटरगेट चौक- जुना मोटार स्टँड
बाहुबली चौक - सेव्हन लव्हज चौक
6. कोरेगाव पार्क वाहतूक विभाग
वाहतुकीस बंद असणारे मार्ग:
नॉर्थ मेन रोड लेन नं. सी ते पाणी पुरवठा केंद्र बर्निग घाट महात्मा गांधी चौकाकडे जाणारा मार्ग
महात्मा गांधी चौका कडुन भारतरत्न मौलाना अबुल आझाद स्मारक पर्यंतचा मार्ग
पर्यायी मार्ग:
कोरेगाव पार्क जक्शंन ते एबीसी फार्म (नॉर्थ मेन रोड)चा वापर करावा.

Photo Credit: Canva
14 जानेवारीपासून ते 16 जानेवारीपर्यंत सकाळी 6 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील पोलीस, अग्निशामक, अॅम्ब्युलन्स तसेच निवडणूक प्रक्रियेत समाविष्ठ असलेली वाहने वगळून) आवश्यकतेनुसार प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
